Maharashtra politics news | शहाजीबापू यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत जोरदार राजकीय फटकेबाजी केली. यावेळी शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यावरही निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी संदीपान भुमरे यांनी सर्व तयारी चांगली केली. स्टेज उभारला, मंडप बांधला, पण त्यांनी एक मोठी चूक केली. त्यांनी व्यासपीठावरील कोपऱ्यात आणखी दोन खुर्च्या ठेवायला पाहिजे होत्या. या खुर्च्यांवर चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांना बसवायला पाहिजे होते.

 

Shahaji Bapu Patil
शहाजीबापू पाटील

हायलाइट्स:

  • बिडकीनमध्ये खास सोहळ्याचे आयोजन
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पेढेतुला होणार होती
औरंगाबाद: एकनाथ शिंदे यांच्या पैठणमधील सभेच्या ठिकाणी मी दोन तास आधी येऊन पोहोचलो होतो. शिंदे साहेब येतील तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी आपल्या हातात हार असायला हवा म्हणून मी माझ्या पोरांना पैठणमध्ये पाठवले होते. मात्र, काहीवेळाने मला त्यांचा फोन आला. पोरं म्हणाली की, हार मिळत नाही. मी त्यांना म्हणालो मग पुष्पगुच्छ बघा, पण तोदेखील मिळाला नाही. शेवटी आम्हाला साधं फुलदेखील मिळाले नाही. कारण, सगळे हार आणि फुलं एकनाथ शिंदे साहेबांच्या सभेमुळे संपली होती, असे वक्तव्य शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले. ते सोमवारी पैठणमधील सभेत बोलत होते.
मुख्यमंत्र्यांच्या सभेला अंगणवाडी सेविकांना हजर राहण्याचे आदेश, अजित पवार संतापले
यावेळी शहाजीबापू यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत जोरदार राजकीय फटकेबाजी केली. यावेळी शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यावरही निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी संदीपान भुमरे यांनी सर्व तयारी चांगली केली. स्टेज उभारला, मंडप बांधला, पण त्यांनी एक मोठी चूक केली. त्यांनी व्यासपीठावरील कोपऱ्यात आणखी दोन खुर्च्या ठेवायला पाहिजे होत्या. या खुर्च्यांवर चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांना बसवायला पाहिजे होते. जेणेकरून त्यांना या सभेसाठी जमलेली गर्दी दिसली असती. हे दोघेजण टीव्हीवर संदीपान भुमरे यांच्यावर टीका करतात. त्यांच्या सभेला माणसं येणार नाहीत, असे म्हणतात. पण त्यांनी टीव्हीच्या माईकसमोर बोलण्याऐवजी मैदानात यावे, म्हणजे त्यांना संदीपान भुमरे काय आहे, हे कळेल, असे शहाजीबापू पाटील यांनी म्हटले.

बिडकीनमधून मुख्यमंत्री गेल्यानंतर शिवसेनेकडून गोमूत्र शिंपडून जागेचं शुद्धीकरण

या सभेपूर्वी बिडकीनमध्ये खास सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पेढेतुला होणार होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्यांना नकार दिला. त्यानंतर पैठणमधील शिंदे यांच्या सभेलाही मोठी गर्दी झाली होती. या सभेला भाजपचे नेते रावसाहेब दानवे आणि भागवतराव कराड हेदेखील उपस्थित आहेत. या सभेपूर्वी काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी व्यासपीठाजवळ जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांना या कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमार करावा लागला.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here