स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी गेले होते
अक्कलकोट येथील श्री. स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन कर्नाटकातील भाविक पहाटेच्या सुमारास सोलापूरकडे येत होते. वळसंग गावाहून लिंबीचिंचोळी हद्दीत गाडी येत असताना पुलावरील डिव्हायडरवर चढल्याने हा अपघात झाला. डीवायडर बस चढल्याने चालकाचा ताबा सुटला आणि हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर वळसंग पोलिस ठाण्याकडील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. बसमधील जखमींना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल केले. या अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक काही वेळ खोळंबली होती अशी माहिती पोलिसांनी दिली.
भीषण अपघातात सहा जण जखमी
सोलापूर अक्कलकोट महामार्गावर खाजगी आराम बसचा अपघात झाला असून त्यामध्ये सहा जण जखमी झाले आहेत. निगम्मा पुजारी (वय ५४,रा रायचूर,कर्नाटक), रुकय्या बेगम शुकुर शेख (वय ७७,रा.मुंबई), अमरीश कोंडी (वय ३३,रा चिंचोळी,गुलबर्गा), सतीश कुमार (वय ३७ रा. यादगिर,कर्नाटक), अप्पाराव काळे (वय ६५ ,रा आळंद,जि गुलबर्गा, कर्नाटक), अनिल राठोड (वय २२,रा,शहापूर,यादगिर,कर्नाटक) असे जखमी झालेल्या प्रवाशांची नावे असून,त्यांना शासकीय सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.