गुहागर : आज सोमवारी १२ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास गुहागर तालुक्यात आरे नागदेवाडी येथे दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या (ST Bus accident). या अपघातात २ चालकांसह ४१ प्रवासी जखमी झाले. अपघाताचे वृत्त कळताच आरजीपीपीएलच्या मेडिकल सेंटरने तातडीने वैद्यकीय सेवा पुरवली. अधिक उपचाराची आवश्यकता असलेल्या १९ जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. अपघातात गंभीर जखमी असलेल्या सुहासिनी सैतवडेकर या महिलेला जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे. तातडीची मदत म्हणून अपघातग्रस्तांना एसटीने ५०० रुपयांची रोख मदत केली आहे. (41 people were injured in the accident where two st buses collided head on in guhagar)

सोमवारी सकाळी आरे नागदेवाडी येथे रानवीच्या दिशेने जाणाऱ्या शृंगारतळी अंजनवेल या एस.टी.ला शृंगारतळीकडे जाणाऱ्या धोपावे चिपळूण या एसटीने धडक दिली.

रत्नागिरी हादरलं! बेपत्ता माजी सभापती महिलेला पतीनेच जाळून मारलं, हत्येची पद्धत वाचून अंगावर काटा येईल
धोपावे चिपळूण एसटी बस संतोष उकार्डे चालवत होते. या गाडीत ३२ प्रवासी होते. तर श्रृंगारतळी अंजनवेल एसटीवर चालक म्हणून डी. एल. भोसले होते. या गाडीत १२ प्रवासी होते. अपघात घडला त्या ठिकाणी वळण आहे. सकाळी ९.२५ च्या दरम्यान पाऊस पडत असताना उकार्डे यांनी उतारावर असलेले वळणावर आपली एसटी चुकीच्या बाजूला (Wrong Side) नेली. त्याचवेळी रानवीकडे जाणाऱ्या शृंगारतळी अंजनवेल एसटीवर ही उकार्डे यांची बस येवून आदळली. या धडकेमध्ये दोन्ही बसमधील प्रवासी समोरच्या सीटवर आदळले. त्यामुळे सर्व प्रवाशांच्या नाका, तोंडाला जखमा झाल्या आहेत.

आदित्य ठाकरेंच्या दापोली दौऱ्यासह सभेचं ठिकाण ठरलं, रामदास कदमांच्या टीकेला प्रत्युत्तर देणार
आरजीपीपीएलचे मदत कार्य

अपघाताचे वृत्त आरजीपीपीएलच्या मेडिकल सेंटरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज इंजे यांना दुरध्वनीवरुन कळले. त्यानंतर डॉ. इंजेनी आपली रुग्णवाहिका अपघातस्थळी पाठवली. जखमींची संख्या जास्त असल्याचे लक्षात आल्यावर डॉ. इंजेनी कोकण एलएनजीचे अधिकारी रेड्डी यांना कळवले. रेड्डीनी त्यांची रुग्णवाहिकाही पाठवून दिली. दरम्यान रानवीचे विलास बारगोडे आपली मारुती व्हॅन घेवून अपघातस्थळी पोचले. या सर्वांनी जखमींना आरजीपीपीएल मेडिकल सेंटरमध्ये आणले. दरम्यानच्या काळात डॉ. इंजेंनी रुग्णालयातून निवासी वसाहतीमध्ये गेलेल्या डॉक्टर, सिस्टर यांना बोलावून घेतले. त्यानंतर डॉ. इंजे, डॉ. रिशु रंजन, डॉ. मनोज चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व जखमींवर प्राथमिक उपचार करण्यास सुरुवात केली.

कोकण रेल्वे: गुड न्यूज! कोकणातील प्रवाशांसाठी रेल्वेने घेतला मोठा निर्णय, १५ तारखेपासून होणार जलद प्रवास
अपघाताचे वृत्त कळताच नगरपंचायतीमधील गटनेते उमेश भोसले, श्रद्धा घाडे, शार्दुल भावे, मंदार पालशेतकर, हेमंत बारटक्के ग्रामीण रुग्णालयात पोचले. त्यांनी सर्व रुग्णांसाठी बेड व अन्य व्यवस्था करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मदत केली.

जखमींची नावे

१. कैलास तुकाराम नायनाक (५०, पालशेत)
२. प्रसाद महादेव वायंगणकर (३२, दाभोळ)
३. साहील पालकर (१८, पालपेणे)
४. सुनंदा गावणकर (८०, रानवी)
५. शकुंतला शिगवण (७५, रानवी)
६. महमंद बामणे (७०, दाभोळ)
७. अश्फाक कुपे (४९, शृंगारतळी)
८. अनिल मोहित (४५, कोथरुड)
९. विलास साळवी (४५, मार्गताम्हाने)
१०. प्रगती भेकरे (५०, रानवी)
११. पार्वती चोगले (७५, रानवी)
१२. पद्मजा तांडेल (७७, वेलदूर)
१३. योगिता वणकर (२५, नवानगर)
१४. कोमल पवार (१८, वेलदूर)
१५. नम्रता पवार (४५, घरटवाडी)
१६. प्रांजली भोरजी (१९, धोपावे)
१७. प्रज्ञेश पाष्टे (१८, खामशेत)
१८. आसावरी कदम (४१, वेलदूर)
१९. संतोष उकार्डे (५३, आबलोली)
२०. अथर्व यादव (१६, पालपेणे)
२१. आदेश वाड्ये (३८, अंजनवेल)
२२. श्रेया बागकर (१५, अंजनवेल)
२३. सानिका भुवड (१७, पवारसाखरी)
२४. सानिका शितप (१७, पवारसाखरी)
२५. चंदना दणदणे (१६, पवारसाखरी)
२६. समिक्षा पवार (१६, पवारसाखरी)
२७. सानिका झगडे (१६, पवारसाखरी)
२८. साहिल भुवड (१७, पवारसाखरी)
२९. सुहासिनी सैतवडेकर (४५, अंजनवेल)
३०. सायली डांगे (४१, अंजनवेल)
३१. सुगंधा कदम (८०, वेलदूर)
३२. आकांक्षा राठोड (१९, आगरवायंगणी)
३३. आयुष पवार (२०, घरटवाडी)
३४. प्रतिक भावे (१६, खामशेत)
३५. मधुकर पारधी (७३ धामणदेवी)
३६. शंकुतला सैतवडेकर (६५, अंजनवेल)
३७. सायली सैतवडेकर (१०, अंजनवेल)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here