वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, फलंदाज श्रेयस अय्यर, फिरकीपटू रवी बिश्नोई, अष्टपैलू खेळाडू दीपक चहर राखीव खेळाडू म्हणून संघासोबत असतील. शमीकडे असलेला अनुभव पाहता त्याला राखीव खेळाडू म्हणून स्थान देण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे शमीनं गेल्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली होती. १६ सामन्यांत त्यानं २० गडी बाद केले होते. गुजरात टायटल्सनं आयपीएलचं जेतेपद पटकावलं. त्यात शमीचा मोठा वाटा होता. शमी वगळता संघातील एकाही गोलंदाजाला २० गडी बाद करता आले नव्हते.
आयपीएलमध्ये गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्यानं शमीचा वापर मोठ्या खुबीनं केला. हार्दिकनं अनेकदा सुरुवातीच्या ८ षटकांमध्येच शमीचा वापर केला. प्रतिस्पर्धी संघाला सुरुवातीलाच धक्के देण्यात आणि धावांना वेसण घालण्यात शमीनं मोलाची भूमिका बजावली. मात्र यानंतरही शमीचा समावेश राखीव खेळाडूंच्या यादीत करण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.
Home Maharashtra t20 world cup, IPLमधील दमदार कामगिरीनंतरही दिग्गज खेळाडू स्टँडबाय; T20 वर्ल्डकपसाठी संघ...
t20 world cup, IPLमधील दमदार कामगिरीनंतरही दिग्गज खेळाडू स्टँडबाय; T20 वर्ल्डकपसाठी संघ जाहीर करताना अन्याय? – indian cricket team announced for world t20 team jasprit bumrah returns mohammed shami standby
मुंबई: टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर झाला आहे. ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबरपासून विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्त्व करेल. विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्मा पहिल्यांदाच संघाचं नेतृत्त्व करताना दिसेल. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं संघात पुनरागमन केलं आहे. हर्षल पटेललादेखील संघात स्थान देण्यात आलं आहे.