दुसरीकडे, शिवसेनेचे उपशहर प्रमुख बाळासाहेब मालुसरे यांनी याच्या अगदी उलट पोलिसांनी केलेल्या कामगिरीचं कौतुक करत त्यांचा थेट वाहतूक आयुक्तालयात जात फेटा बांधूनच सत्कार केला. “पोलिसांचे कार्य हे कौतुक करण्यासारखेच आहे. १० दिवस उत्सवाचे आणि दोन दिवस मिरवणुकीचे आपण जल्लोष करत होतो. मात्र पोलीस बांधव आपल्यासाठी रस्त्यावर उभे होते. यांना सण उत्सव नाहीत का? पण ते आपल्या संरक्षणासाठी रात्रंदिवस उभे असतात. १२ दिवसांचा हा उत्सव त्यांनी निर्विघ्नपणे पार पाडला. म्हणूनच त्यांचा हा सत्कार केला’, असं मालुसरे म्हणाले.

पोलिसांनी केलेल्या कामगिरीचं कौतुक
दरम्यान, वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी पोलिसांनी केलेल्या कामगिरीची प्रशंसा केली. आपल्या सहकाऱ्यांचे तोंडभरून कौतुक केले. सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी अतिशय चांगलं काम केल्यानेच गणेशोत्सव अतिशय जल्लोषात कुठेही गालबोट न लागत पार पडला आहे. ३२-३३ तास उभे राहत कर्तव्य बाजवणारे सर्वजण खरंच कौतुकास पात्र आहेत, असं राहुल श्रीरामे म्हणाले.
त्यामुळे आता राहिला प्रश्न पोलिसांच्या गणेशोत्सवातील कर्तव्य निष्ठेवर आणि नृत्यावर प्रश्न उपस्थतीत करण्याचा तर पोलीस कायम दबावात असतातच पगार नाही, सुट्टी नाही, सणासुदीला नेमकी ड्युटी, कुटुंबासमवेत वेळ घालवता येत नाही, रहायला घर नाही, पॅरेंट्स मिटिंगला जाता येत नाही, हज्जार रिसिविंग, शिवाय बॉसची, समाजाची बोलणी वेगळीच… याशिवाय रेग्युलर ड्युटी….अशा स्थितीत ३२-३३ तासांच्या गणपती विसर्जन मिरवणुकीचा बंदोबस्त आटोपुन रिलैक्स व्हायला पोलिसांनी ठेका धकला तर चुकलं कुठं? असं देखील आता बोललं जात आहे.
Pune : पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीने केला रेकॉर्ड ब्रेक, २९ तास चालला दणदणाट