husband catches wife with lover: उत्तर प्रदेशच्या आग्र्यात पती, पत्नी आणि तिच्या मित्रामध्ये भररस्त्यात राडा झाला. पत्नी तिच्या एका मित्रासोबत दुचाकीवरून फिरत होती. त्यावेळी मुलीला दुचाकीवरून बसवून पतीनं दुचाकीवरून फिरत असलेल्या पत्नीचा पाठलाग सुरू केला. पत्नी दुसऱ्या पुरुषासोबत दिसताच पतीनं आरडाओरडा सुरू केला

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पती आणि महिलेच्या मित्राविरोधात शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. भविष्यात अशाप्रकारे वर्तणूक न करण्याची ताकीद त्यांना देण्यात आली. महिलेचा विवाह १० वर्षांपूर्वी झाली असून तिला एक मुलगीदेखील आहे. एका तांदूळ व्यापाऱ्याशी महिलेचं संबंध आहेत.
महिलेचे परपुरुषाषी संबंध असल्याचा संशय तिच्या पतीला होता. त्यावरून दोघांमध्ये अनेकदा वाद झाले. आज पत्नी काही न सांगताच घराबाहेर पडली. त्यावेळी पतीनं तिचा गुपचूप पाठलाग केला. त्याला पत्नी एका मित्रासोबत फिरताना दिसली. पतीनं पत्नीला रंगेहात पकडलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.