mother strangled daughter: एका आईनं आपल्या पोटच्या गोळ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. महिलेनं गळा दाबून दीड महिन्याच्या लेकीला संपवण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. हा प्रकार पाहून रुग्णालयातील कर्मचारी हादरले.

१० सप्टेंबरला श्रेयाची तब्येत सुधारली. त्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी श्रेयाला सुमनकडे दूध पाजण्यासाठी दिलं. थोड्याच वेळात श्रेयाची प्रकृती बिघडली. त्यानंतर सुमनच्या सासूनं डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टरांनी श्रेयाला तपासलं. तिच्या हृदयाचे ठोके कमी पडत होते. थोड्याच वेळापूर्वी अतिशय उत्तम असलेली श्रेयाची प्रकृती अचानक कशी बिघडली असा प्रश्न डॉक्टरांना पडला.
संशय वाटल्यानं डॉक्टरांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं. त्यात सुमन श्रेयाचा गळा दाबताना दिसली. डॉक्टरांनी तातडीनं आईला मुलीपासून वेगळं केलं. वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी श्रेयाला सीपीआर दिला. डॉक्टरांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी सुमनला अटक केली. सुमनचा विवाह ३ वर्षांपूर्वी सोनूशी झाला. १६ जूनला सुमनला मुलगी झाली. मात्र सुमनला मुलगा हवा होता. त्यातच मुलीला श्वासाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे सुमन कंटाळली होती.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.