कल्याण : कल्याण डोंबिवली शहर हे स्मार्ट सिटी आहे हे ऐकूनच मी हैराण झालो. ज्या शहराला स्मार्ट सिटी म्हणून घोषित केले आहे, त्या ठिकाणी बदल आणि काम झालेले मी पाहिले आहे. मात्र कल्याण डोंबिवली हे शहर स्मार्ट सिटी म्हणून घोषित केल्याचे मला वाटलेच नाही, असे खडेबोल केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे आणि आधिकाऱ्यांना सुनावले आहेत. दरम्यान, केडीएमसीमध्ये गेली अनेक वर्षे शिवसेना-भाजपची सत्ता राहिली आहे. खासदार, आमदार आणि नगरसेवक सुद्धा शिवसेना-भाजपचे राहिले आहेत. त्यामुळे यांचे अंकुश अधिकाऱ्यांवर नव्हता का?, असा सवाल उपस्थित केला जातो आहे. (union minister anurag thakur says that i do not think that kalyan dombivali city is a smart city)

कल्याण लोकसभा मतदार संघाचा तीन दिवसीय अभ्यास दौरा करण्यासाठी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर कल्याण डोंबिवली शहरात आले आहेत. काल दुसऱ्या दिवशी सायंकाळी त्यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेचे कल्याण येथील मुख्यालयात महापालिका आयुक्त, अधिकारी आणि कर्मचारी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान ते स्मार्ट सिटीच्या कार्यालयात गेले होते.

मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यातील धक्कादायक वास्तव उघड; रस्त्याअभावी महिला सरपंचासह जावयाचा मृत्यू
यावेळी त्यांना स्मार्ट सिटी संदर्भातील काही व्हीडीओ दाखवण्यात आले. हे व्हिडीओ पाहता क्षणीच त्यांनी ही स्मार्ट सिटी आहे हे ऐकूनच मी हडबडलो असे सांगत ज्या शहरात स्मार्ट सिटीची घोषणा केली आहे तेथे स्वच्छता, वृक्षारोपण असे विविध उपक्रम रबवल्याने शहरे सुंदर झालेली मी पहिली आहेत. मात्र कल्याण-डोंबिवली शहरात दोन दिवसांच्या दौऱ्यात हा बदल मला कुठेही दिसला नाही, असे सांगताना त्यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तांना खडेबोल सुनावले. दरम्यान केडीएमसी मध्ये गेले अनेक वर्षे शिवसेना-भाजप सत्ता राहिली आहे. खासदार, आमदार आणि नगरसेवक सुद्धा शिवसेना-भाजपचे राहिले आहेत. त्यामुळे यांचे अंकुश अधिकाऱ्यांवर नव्हते का?, असा सवाल उपस्थित केला जातो आहे.
MNS Banner : बाप्पा बाप्पा बुद्धी द्या, पुढच्या वर्षी तरी होऊ द्या… मनसेच्या बॅनरची जोरदार चर्चा
मंत्र्यांच्या टीकेनंतर आमदार राजू पाटलांचा टोला

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केडीएमसी आणि अधिकारी यांना स्मार्टसिटी वरून खडेबोल सूनवल्यानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी अनुराग ठाकूर यांना टॅग करून हिंदी आणि मराठी मधून ट्विट करत केडीएमसीच्या अधिकाऱ्यांवर टीका केली आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी मराठी आणि हिंदी मधून ट्विट करत आणि ठाकूर यांना टॅग करत सांगितले की आमची केडीएमसी फक्त सेटींगमध्ये स्मार्ट आहे. मग ती टक्केवारीची असो की नवनवीन पुरस्कार असो….बरं झाले आपणच घरचा आहेर दिला.

ठाण्यात दुर्घटना: सार्वजनिक गणपतीच्या मंडपावर झाड कोसळले; एका महिलेचा मृत्यू, ४ जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here