पुणे : राज्यात दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटात संघर्ष सुरू असतानाच आणखी एक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनीही आपण भगवान गडावर दसरा मेळावा घेणार असल्याची घोषणा केली आहे. पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना करुणा मुंडे यांनी ही माहिती दिली आहे.

यावेळी करुणा मुंडे म्हणाल्या की, ‘मी देखील वंजारी समाजाची सून असल्याने आणि मुंडेंच्या एकुलत्या एक वंशाचा दसऱ्याच्या दिवशी वाढदिवस असल्याने भगवान गडावर दसरा मेळावा घेणार आहे. ७ ते ८ वर्षांपासून भगवान गडावर दसरा मेळावा होत नाही. जी दसरा मेळाव्याची परंपरा खंडित झाली आहे ती परंपरा यंदा परत सुरू करणार आहे,’ असं त्यांनी जाहीर केलं आहे.

भारतात ‘इलेक्ट्रिक हाय-वे’ प्रत्यक्षात उतरणार; ट्रक, बसचे धावता-धावता चार्जिंग करता येणार

दरम्यान, भगवान गडाशी संबंधित नागरिकांनी मला दसरा मेळाव्यासाठी सहकार्य करावं, अशी विनंती करुणा मुंडे यांनी केली आहे.

पंकजा मुंडे आणि दसरा मेळाव्याचा वाद

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडून भगवान गडावर घेण्यात येणाऱ्या दसऱ्या मेळाव्यावरून काही वर्षांपूर्वी मोठं वादंग निर्माण झालं होतं. त्यानंतर पंकजा मुंडे यांना मेळाव्याचं ठिकाणही बदलावं लागलं. गेल्या काही वर्षांपासून पंकजा मुंडे या संत भगवान बाबा यांचे जन्मगाव असलेले सावरगाव या ठिकाणी दसरा मेळावा घेत आहेत. अशातच करुणा मुंडे यांनी भगवान गडावर दसरा मेळावा घेण्याची घोषणा केल्याने आता राज्यातील बहुचर्चित दोन्ही दसऱ्या मेळाव्यांबाबत राजकारण तापणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here