मुंबई : शहरातील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास एक दुर्घटना घडली. विले पार्ले येथे धावत्या कारने अचानक पेट घेतला. मात्र प्रसंगावधान राखत चालक वेळीच बाहेर पडल्याने सुदैवाने प्राण वाचले आहेत. या दुर्घटनेवेळी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी गाडी थांबवत सदर कारचालकाला धीर दिल्याचं पाहायला मिळालं.
मुख्यमंत्र्यांनी भर पावसात गाडी थांबवत तरुणाला धीर दिल्याने या घटनेचा व्हिडिओ आता समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.
दरम्यान, सदर वाहनाने पेट कशामुळे घेतला, याबाबतची माहिती अद्याप समोर आली नसून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.