Mumbai Weather Update : मान्सूनच्या शेवटच्या महिन्यात पुन्हा एकदा पावसाने पुनरागमन केल्याने अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने सोमवारी अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवला होता, अशा स्थितीत अनेक राज्यांत जोरदार पाऊस झाला. विशेषतः उत्तर आणि दक्षिण भारतात पावसाच्या कोसळधारा पाहायला मिळाल्या. त्यानंतर आजही हवामान खात्याने अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याने अनेक राज्यांत पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ढगाळ वातावरणासह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याची शक्यता आहे तर इतर अनेक राज्यांना पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) उत्तर पश्चिम भारत आणि उत्तराखंडमध्ये १४ ते १६ सप्टेंबर दरम्यान पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील पाच दिवस दक्षिण गुजरात, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात जोरदार पाऊस सुरू पडण्याची शक्यता आहे. तर मध्य प्रदेश, गुजरात, मध्य महाराष्ट्रातील घाट भागात, कोकण आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

क्विंटलला १४ हजारचा भाव असताना शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच, पावसामुळे ‘या’ पिकांना बसला फटका
दरम्यान, पुणे, कोल्हापूर, कोकण, सातारा जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर उर्वरित राज्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे. पावसाचा जोर पाहता स्थानिक प्रशासनाने नदीलगतच्या भागात राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

आयएमडीने मुंबई, रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, उस्मानाबादसह अनेक भागांसाठी अलर्ट जारी केला आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार किंवा मध्यम पावसाची शक्यता आहे. गेल्या आठवड्यातच महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. मुंबई आणि ठाण्यात पावसाचा थेट परिणाम वाहतुकीवर होत आहे.

प्रसादामध्ये दिले गुंगीचे औषध; दैवी शक्ती असल्याचे भासवून तरुणीवर वारंवार बलात्कार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here