उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणी आरोपी शमीम अहमदचा पोलीस कसून शोध घेत आहेत. या आरोपीला पकडण्यासाठी एनआयएने (NIA) रोख बक्षीस जाहीर केले आहे. शमीमची माहिती देणाऱ्याला दोन लाख रुपयांचे बक्षीस दिले, जाईल असे NIA कडून सांगण्यात आले आहे.
उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मुदस्सर अहमद (२२), शाहरुख पठाण (२५), अब्दुल तौफिक (२४), शोएब खान (२२), अतीब रशीद (२२), युसूफ खान (३२) आणि कथित सूत्रधार शेख यांना अटक केली आहे. अमरावतीत इरफान शेख रहीम याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील आणखी एका संशयित शमीम अहमदचा पोलीस शोध घेत आहेत.
उमेश कोल्हे यांच्यावर २१ जून रोजी रात्री १० ते १०:३० च्या दरम्यान तिघांच्या टोळक्याने चाकूने हल्ला केला होता. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. टीव्ही डिबेटमध्ये पैगंबर मुहम्मद यांच्यावर टिप्पणी करणाऱ्या नुपूर शर्माच्या समर्थनार्थ त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. बातमीनुसार, या हत्येतील आरोपी मुदस्सीर मौलाना आहे. तो अगदी सामान्य कुटुंबातून राहतो. हत्येचा संपूर्ण कट त्यानेच रचल्याचं सांगण्यात येत आहे. अशात शाहरुख पठाण, अब्दुल तौफीक, शोएब खान उर्फ भुरिया, अतीक रशीद हे मजूर म्हणून काम करायचे.