Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Sep 13, 2022, 1:26 PM

Shivsena vs Eknath Shinde Camp : शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांचं पिस्तुल जप्त करण्यात आलं आहे. विसर्जनानंतर झालेल्या राजकीय राड्यात गोळी झाडल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. तसेच, घटनास्थळावरुन बंदुकीची गोळीही जप्त करण्यात आली आहे.

 

Shivsena vs Eknath Shinde Camp
Shivsena vs Eknath Shinde Camp : सरवणकरांची पिस्तुल पोलिसांच्या ताब्यात, घटनास्थळी बंदुकीची गोळीही सापडल्याने अडचण

हायलाइट्स:

  • सदा सरवणकरांच्या अडचणी वाढणार?
  • घटनास्थळावरुन बंदुकीची गोळी जप्त
  • पिस्तुलही घेतलं ताब्यात
मुंबई: मुंबईतील प्रभादेवीत शिवसेना आणि शिंदे गटात झालेल्या राडा प्रकरणी सदा सरवणकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचं पिस्तुल जप्त करण्यात आलं आहे. दादर पोलिसांनी सदा सरवणकरांचं पिस्तुल जप्त केलं आहे. विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या राड्यावेळी सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. तसेच, याप्रकरणी चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, घटनास्थळावरुन पोलिसांकडून गोळीही जप्त करण्यात आली होती.

गणेश विसर्जनासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शिवसेना आणि शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये मोठा राडा झाला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना शांत राहण्याचे आदेश दिल्यांनतर हा संघर्ष टळला होता. मात्र, शनिवारी हा वाद पुन्हा उफाळून आला. सदा सरवणकर समर्थकांकडून शिवसैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न केल्यानंतर शाब्दिक बाचाबाचीही झाली. यानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत यांच्यासह शिवसैनिकांना पिस्तुलचा धाक दाखवून गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता. त्यानंतर सदा सरवणकर यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल झाला.

आता माझी वेळ आलीय महाराष्ट्रासाठी; दसरा, गुढीपाडवा हे सोडून मी माझे मेळावे घेईन | अभिजीत बिचुकले

गणेश विसर्जनाच्या दिवशी प्रभादेवी परिसरात शिवसेनेकडून गणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी मंच उभारण्यात आला होता. मात्र, या मंचाच्या शेजारी शिंदे गटाने देखील आला मंच उभारला होता. या मंचावरुन शिंदे गटाच्या लोकांनी शिवसेनेच्या नेत्यांवर अपशब्द वापरले. त्यामुळे दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाचीदेखील झाली. या वादाचे रुपांतर राड्यात झाले. शिंदे गटात असलेले माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि वरळीतील शिवसेनेच्या माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर यांच्यात वाद झाले होते. दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर शनिवारी शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती.

देवेंद्र फडणवीसांनी कृषिमंत्र्यांना भर मंत्रिमंडळ बैठकीत झापलं, सत्तारांची हाताची घडी तोंडावर बोट!

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here