ठाणे : पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर मुंबईसह आसपासच्या शहरांमध्ये होणाऱ्या दुर्घटनांमध्येही वाढ होत आहे. मिरा-भाईंदरमधील उत्तन येथील फेमस बिल्डिंगच्या मागील परिसरातील एका झोपडीवर चिंचेचे झाड कोसळलं आहे. या दुर्घटनेत झोपडीत राहणाऱ्या एका ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास पावसामुळे उत्तन येथील एका झोपडीवर झाड कोसळले. यावेळी झोपडीत असणाऱ्या पांडुरंग काशिनाथ दिवा (वय ५२) वर्ष यांचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. सदर झोपडीत राहणाऱ्या नर्मदा पांडुरंग दिवा (मृत व्यक्तीची पत्नी) आणि हिरा गणेश परेड (मृत व्यक्तीची मुलगी) यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.

चार्जिंगला लावलेला मोबाईल फुटला, जग पाहण्याआधीच बाळाने घेतला जगाचा निरोप

दरम्यान, सदर दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कक्षाची टीम घटनास्थळी दाखल झाली. या टीमकडून घटनास्थळी मदतकार्य राबवण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here