नवी दिल्ली : पर्यावरणाचे कमी नुकसान करण्यासाठी देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावर भर दिला जात आहे. इलेक्ट्रिक बस, कार आणि बाइक, स्कूटीनंतर आता देशात इलेक्ट्रिक हायवे बनवण्याचा विचार पुढे येत आहे. देशात इलेक्ट्रिक हायवे बनवण्याचा प्रस्ताव जारी करण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रस्तावाबाबत माहिती दिली असून, लवकरच देशात ट्रक आणि बस यांसारख्या अवजड वाहनांसाठी इलेक्ट्रिक हायवे तयार केले जात आहेत. हे ट्रक आणि बसेस इलेक्ट्रिक वाहनांप्रमाणे असतील, जे हायवेवर ओव्हरहेड बसवलेल्या इलेक्ट्रिक वायर्सद्वारे चार्ज आणि चालवले जातील.

सरकार विद्युत महामार्गासाठी कार्यरत
पीटीआयच्या वृत्तानुसार, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी सांगितले की, सरकार सौरऊर्जेद्वारे विद्युत महामार्गांच्या विकासावर काम करत आहे. हे पाऊल उच्च मालवाहतूक क्षमता असलेल्या ट्रक आणि बसेसची चार्जिंग सुलभ करेल.

वाहनचालकांसाठी खूशखबर! आता टोल नाक्यावरची गर्दी कमी होणार, नितीन गडकरींची मोठी घोषणा

सौर आणि पवन ऊर्जेवर आधारित चार्जिंग स्टेशन
सरकारला देशाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विजेवर चालणारी बनवायची आहे, तसेच सरकार इलेक्ट्रिक वाहनांसाठी सौर आणि पवन ऊर्जेवर आधारित चार्जिंग सिस्टीमच्या विकासाला प्रोत्साहन देत आहे. असे गडकरी यांनी सांगितले.

Cyrus Mistry Death: सीटबेल्टशी संबंधित हे प्रोडक्ट विकू नका, मोदी सरकारचा अमेझॉनला इशारा
इलेक्ट्रिक हायवे म्हणजे काय?
इलेक्ट्रिक हायवे म्हणजे त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना वीजपुरवठा करणारा रस्ता. यामध्ये ओव्हरहेड पॉवर लाईन्सद्वारे ऊर्जा पुरवठा केला जातो. नितीन गडकरी म्हणाले की, रस्ते मंत्रालय टोल प्लाझा सौरऊर्जेवर चालवण्यासही प्रोत्साहन देत आहे.

वाऱ्याच्या वेगाने गाड्या पळवता येणार, केंद्र सरकार महामार्गांवरील वेगमर्यादा वाढवणार? प्रस्तावावर गडकरींची चर्चा
२६ नवीन द्रुतगती मार्ग
नितीन गडकरींनी असेही सांगितले की त्यांचे सरकार २६ नवीन एक्स्प्रेस वेवरही काम करत आहे. पीएम गति शक्ती मास्टर योजनेमुळे प्रकल्पांना जलद मंजुरी मिळेल आणि यामुळे लॉजिस्टिक खर्च कमी होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here