girl dies inside school bus: मूळची केरळची रहिवासी असलेल्या चिमुकलीचा कतारमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कतारच्या वाक्रा येथे ही घटना घडली. शाळेच्या बसचा चालक बस लॉक करून निघून गेला. एसी बस असल्यानं काचा बंद होत्या. श्वास कोंडला गेल्यानं मुलीचा मृत्यू झाला. मिन्सा असं या मुलीचं नाव आहे.

 

girl died in bus
कोट्ट्यायम: मूळची केरळची रहिवासी असलेल्या चिमुकलीचा कतारमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कतारच्या वाक्रा येथे ही घटना घडली. शाळेच्या बसचा चालक बस लॉक करून निघून गेला. एसी बस असल्यानं काचा बंद होत्या. श्वास कोंडला गेल्यानं मुलीचा मृत्यू झाला. मिन्सा असं या मुलीचं नाव आहे.

केरळच्या पान्नीमाट्टोमचे रहिवासी असलेले अभिलाष चाको आणि सौम्या कतारच्या वाक्रा येथे राहतात. त्यांची मुलगी मिन्साचा रविवारी वाढदिवस होता. त्याच दिवशी तिला मृत्यूनं गाठलं. त्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. केजीमध्ये शिकत असणारी मिन्सा रविवारी सकाळी बसनं शाळेत जाण्यासाठी निघाली. बसमध्ये तिला झोप लागली. बस शाळेच्या परिसरात पोहोचल्यावर सर्व विद्यार्थी खाली उतरले. बस चालक आणि वाहकाचं लक्ष मिन्साकडे गेलं नाही. त्यानं बस बंद केली आणि निघून गेला.
माता न तू वैरिणी! दीड महिन्यांच्या लेकीचा आईनं गळा दाबला; डॉक्टरांनी CCTV पाहिले अन् मग…
विद्यार्थ्यांना बसनं घरी सोडण्यासाठी चालक आणि वाहक काही तासांनी बसकडे परतले. त्यांना दार उघडल्यावर त्यांना मिन्सा दिसली. तिला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. मिन्साची प्राणज्योत मालवली होती. बाकीचे विद्यार्थी बसमधून उतरल्यानंतर चालकानं एसी बंद केला. त्यामुळे मिन्साचा श्वास कोंडला आणि तडफडून तिचा मृत्यू झाला. सध्या कतारमधील तापमान ३६ ते ४३ अंश सेल्सिअस इतकं आहे.
तुझे तसले फोटो माझ्याकडे आहेत! धमकावून महिलांना न्यूड कॉल करायला लावले; ट्रक चालकाचा प्रताप
कतारमधील शिक्षण आणि उच्च शिक्षण मंत्रालयानं मिन्साच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. संबंधित विभागाच्या मदतीनं मंत्रालयानं या घटनेचा तपास सुरू केला आहे. मिन्साचे वडील अभिलाष चाको गेल्या १० वर्षांपासून कतारमध्ये ग्राफिक डिझायनर म्हणून काम करतात. त्यांना दोन मुली आहेत. मिन्सा त्यांची मोठी मुलगी होती. मिन्साचं पार्थिव मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here