बीड : आतापर्यंत आपण चांगलं काम केल्यानंतर एखाद्या व्यक्तीचा किंवा अधिकाऱ्याचा सत्कार सोहळा आयोजित करून सत्कार केलेला पाहिला असेल. मात्र, बीडमध्ये एक अनोखा सत्कार सोहळा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पार पाडला आहे. बीडमध्ये सर्रास आणि खुल्या स्वरूपात सुरू असलेल्या गुटख्यावरून चक्क अन्न औषध प्रशासनाचे उपायुक्त इम्रान हाश्मी यांचा हार लावलेल्या टोपलीत विविध प्रकारचा गुटखा देऊन अनोखा सत्कार केला आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश सचिव नीलकंठ वडमारे म्हणाले की, बीड शहरासह जिल्ह्यात टपरी, किराणा दुकानांसह विविध प्रकारच्या दुकानांमध्ये गुटख्याची सर्रास विक्री केली जाते. मात्र, यावर कुठलीच ठोस कारवाई अन्न औषध प्रशासनाकडून केली जात नाही. केवळ खुर्चीला भार म्हणून हे अधिकारी जिल्ह्यात काम करत आहेत. जर बीड जिल्ह्यातील गुटखा माफीयांना लगाम लावला नाही, त्यावर कठोर कारवाई केली नाही तर अन्नपुरवठा मंत्री यांना घराबाहेर निघू देणार नाहीत. असा सज्जड दम वजा इशारा यावेळी नीलकंठ वडमारे यांनी दिला.

आता माझी वेळ आलीय महाराष्ट्रासाठी; दसरा, गुढीपाडवा हे सोडून मी माझे मेळावे घेईन | अभिजीत बिचुकले

तर याविषयी अन्न औषध प्रशासनाचे उपायुक्त इमरान हाश्मी म्हणाले की, आमच्या कार्यालयात स्टाफ कमी आहे. केवळ ११ कर्मचारी आणि अधिकारी कार्यालयात आहेत. त्यामुळे कारवाई करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे यावर्षी फक्त एकच कारवाई करता आली आहे. आता निवेदन मिळाले असून आता कारवाई करू, असं हाश्मी म्हणाले.

दरम्यान, गडगंज पगार घेणाऱ्या या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात नऊ महिन्यात केवळ एकच कारवाई केली आहे. तर दुसरीकडे बीड पोलीस हे आठवड्यातून दोन-तीन कारवाया गुटख्याच्या करतात. मग पोलिसांना दिसणारा गुटखा अन्न औषध प्रशासनाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना का दिसत नाही? असा सवाल देखील उपस्थित केला जातोय. त्याच बरोबर गुटखा माफियांना याच अधिकाऱ्यांचं पाठबळ असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

शिंदे सरकारचं दिवाळी गिफ्ट, मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होण्याचे संकेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here