गेल्या काही वर्षात बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अभिनेत्रींनी त्यांना आलेल्या कास्टिंग काऊचा अनुभव शेअर केलाय.आता मंदाकिनी यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीची आणखी एक काळी बाजू लोकांसोबत शेअर केली आहे.
गेल्या २६ वर्षांपासून मंदाकिनी बॉलिवूडपासून दूर होत्या. रातोरात स्टार झालेल्या मंदाकिनी अचानक बॉलिवूडमधून गायब झाल्या. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सिनेसृष्टीबद्दल अनेक खुलासे केले आहेत.
काय म्हणाल्या मंदाकिनी?
ज्यावेळी त्यांनी चित्रपटात काम करायला सुरुवात केली होती, त्या वेळी अभिनेत्रींना जास्त महत्त्व दिलं जात नव्हतं. त्यांचा वापर चित्रपटातील नाचगाणी आणि रोमॅन्टिक सीन्ससाठी केला जायचाय. हिरोलाच महत्त्व दिलं जात होतं. इतकंच नव्हे तर अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या मानधनावरही मंदाकिनी यांनी भाष्य केलं. एका चित्रपटासाठी अभिनेत्रींना केवळ १.५ लाख रुपयांचं मानधन मिळालायचं असंही त्या म्हणाल्या.
करिअरला ब्रेक
मंदाकिनींच्या करिअरला ब्रेक तेव्हा लागला जेव्हा त्यांचं नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जोडलं गेलं. दाऊद आणि मंदाकिनी यांच्या अफेअरच्या चर्चा झाल्या. मंदाकिनी यांनी दाऊदसोबत कोणतेही संबंध किंवा अफेअर असल्याचं वृत्त फेटाळलं पण त्यावेळी समोर आलेल्या या दोघांच्या काही फोटोंनी मंदाकिनी यांच्या करिअरमध्ये वादळ आलं. मंदाकिनी यांना आपल्या चित्रपटात घेण्यास निर्मात्यांनी नकार दिला आणि मंदाकिनी यांना मिळणाऱ्या ऑफर कमी होत गेल्या. अखेर वेळ अशी आली की, त्यांच्याकडं कोणताच चित्रपट राहिला नाही तेव्हा १९९६ साली त्यांनी बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला.