Maharashtra Politics | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज औरंगाबादमध्ये सभा पार पडली. या सभेत मुख्यमंत्र्यांनी सामनातील टीकेला प्रत्युत्तर दिलं. साबणाचे बुडबुडे म्हणणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी यावेळी सुनावलं. तसंच दाऊद आणि मेमनचे हस्तक होण्यापेक्षा मोदी शहांचे होऊ असं शिंदे म्हणाले. पैठण येथील मुख्यमंत्र्यांचे भाषण पाहता त्यांनी विरोधकांवर विशेषत: शिवसेनेवर नियोजनबद्ध पद्धतीने टीका केल्याचे दिसून आले

 

Eknath Shinde Van
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हायलाइट्स:

  • एकनाथ शिंदे हे आजही स्वत:ला एक कार्यकर्ता मानतात
  • त्यांनी जाहीररित्या ही बाब अनेकदा बोलूनही दाखवली
  • शिंदे यांनी यावेळी ‘सामना’च्या रोखठोक सदरातील काही लेखांचे मथळे वाचून दाखवले
मुंबई: राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातत्याने उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष्य करताना दिसत आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर विधानसभेत केलेल्या पहिल्या भाषणापासून ते आतापर्यंत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अनेक मुद्द्यांवरुन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लक्ष्य केले आहे. सोमवारी पैठण येथील सभेतही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. पण यावेळी त्यांच्या भाषणाच्या शैलीत एक बदल दिसून आला. एकनाथ शिंदे हे आजही स्वत:ला एक कार्यकर्ता मानतात. त्यांनी जाहीररित्या ही बाब अनेकदा बोलूनही दाखवली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे प्रसारमाध्यमे किंवा भाषण करताना जे काही बोलतात, त्यापैकी बऱ्याचशा गोष्टी त्यावेळी सुचलेल्या म्हणजे उत्स्फूर्त अशा असतात. परंतु, पैठण येथील मुख्यमंत्र्यांचे भाषण पाहता त्यांनी विरोधकांवर विशेषत: शिवसेनेवर नियोजनबद्ध पद्धतीने टीका केल्याचे दिसून आले. त्यांच्यातील हा बदल राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला होता.
मुख्यमंत्र्यांचं भाषण होईपर्यंत भुमरे मागे थांबले, कानातही बोलले, पण शिंदेंनी काही घोषणा केली नाही!
एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात मुंबईतील मराठी माणसाची दुरावस्था, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील लिखाण अशा विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने शिवसेनेला लक्ष्य केले. यावेळी एकनाथ शिंदे हे नेहमीप्रमाणे केवळ उत्स्फुर्तपणे बोलत नव्हते तर ते संपूर्ण ‘गृहपाठ’ करुन आल्याचे दिसत होते. एकनाथ शिंदे यांनी यावेळी ‘सामना’च्या रोखठोक सदरातील काही लेखांचे मथळे वाचून दाखवले. त्यानंतर एक-एक करुन या सगळ्याचा समाचार घेतला. तसेच ‘सामना’त आता मुंबईतील मराठी माणसाच्या दुरावस्थेविषयीही लिहा, असा खोचक सल्लाही शिंदे यांनी दिला. साधारणत: देवेंद्र फडणवीस अशा पद्धतीने मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण मांडणी करुन विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतात. त्यामुळे दोन महिन्यांत एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांची ही शैली आत्मसात केली आहे का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
Eknath Shinde: तुमच्या काळात मुंबईतील मराठी माणूस बाहेर का फेकला गेला? मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना सवाल
देशद्रोह्यांचा हस्तक होण्यापेक्षा मोदी-शाहांचा हस्तक होणं केव्हाही चांगलं: एकनाथ शिंदे

शिंदे गट हा नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा हस्तक असल्याची टीका शिवसेनेकडून केली जाते. पण याकुब मेमन आणि दाऊदचे हस्तक होण्यापेक्षा ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेले, कलम ३७० रद्द केले त्या नरेंद्र मोदी (PM Modi) आणि अमित शाह (Amit Shah) यांचे हस्तक होणे, हे केव्हाही बरे आहे. गद्दार आणि देशद्रोही लोकांचा हस्तक होण्यापेक्षा आम्ही मोदी-शाहांचे हस्तक होणार असू, तर ते आम्हाला चालेल, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पैठणमधील सभेत केले होते.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here