Hingoli News : हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातील ताकतोडा गावातील शेतकरी नामदेव पतंगे यांनी सिद्धारामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रक्ताने लिहिलेले पत्र पाठवले आहे.

हायलाइट्स:
- “मंत्री महोदय आम्ही महाराष्ट्रात राहतो का? बिहारमध्ये”
- हिंगोली जिल्ह्यातील नामदेव पतंगे यांनी मुख्यमंत्र्यांना रक्ताने लिहीलं पत्र
- हिंगोलीतील सेनगाव तालुक्यातील शेतकरी
“मंत्री महोदय आम्ही महाराष्ट्रात राहतो का…? बिहारमध्ये”, असा सवालही या पत्रातून नामदेव पतंगे यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. या पत्रातून नामदेव पतंगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेतकऱ्यांच्या समस्या मांडून अतिवृष्टीतून वगळण्यात आलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ समाविष्ट करून मदत देण्यात यावी अशी मागणी केली आहे.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये पेरणी झाल्याच्या सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. पती पासून पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात प्रचंड नुकसान झाले होते. अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा सामना करावा लागला. तर काही भागात शेती सगट पेरलेले पीकही वाहून गेले. त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागले.शेतकऱ्यांना मदत करणे ऐवजी राज्यातील बडे बडे नेते राज्याच राजकारण करण्यात व्यस्त होते.
खरंतर सनग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत होणे गरजेचे होते पण असे झाले नाही. या उलट ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले अशा शेतकऱ्यांचे पंचनामे देखील झाले नसून हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळ ही अतिवृष्टीतून वगळण्यात आली आहे. त्यामुळे यातील नुकसानग्रस्त शेतकरी हे शासनाच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा या यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावा याकरता शेतकऱ्यांनी मोर्चे केले निषेध केले परंतु काहीही फरक झाला नाही. याच बरोबर प्रशासनाने हात झटकले विभागाचे देखील अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर फिरकलेच नाही.
आता माझी वेळ आलीय महाराष्ट्रासाठी; दसरा, गुढीपाडवा हे सोडून मी माझे मेळावे घेईन | अभिजीत बिचुकले
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.