गाझियाबाद: उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील डॉक्टरांना अमेरिकेहून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. डॉक्टरांना व्हॉट्स ऍप कॉलच्या माध्यमातून ठार मारण्याची धमकी मिळाली. गाझियाबादच्या सिहानी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या डॉ. अरविंद वत्स यांना मंगळवारी एक व्हॉट्स ऍप कॉल आला. पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीनं वत्स यांना शिर धडावेगळं करण्याची धमकी दिली.

आम्ही रेकी पूर्ण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तुम्हाला वाचवू शकणार नाहीत, अशी धमकी वत्स यांना मिळाली. वत्स गेल्या दोन दशकांपासून लोहिया नगरात स्वत:चा दवाखाना चालवत आहेत. धमक्या मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली, अशी माहिती आलोक दुबे यांनी पीटीआयला दिली. अरविंद वत्स हिंदू संघटनांशी संबंधित आहेत.
वाहतूक कोंडीत अडकली कार; डॉक्टर ४५ मिनिटं धावले; सर्जरी करून रुग्णाला जीवनदान
१ सप्टेंबरला मला अमेरिकेतील नंबरवरून दोन मिस्ड कॉल आले. त्यावेळी मी झोपलो होतो. त्यामुळे मला कॉल्स घेता आले नाहीत. मी त्या नंबरवर कॉल केले. मात्र फोन लागला नाही, असं वत्स यांनी सांगितलं. ७ सप्टेंबरला वत्स यांना पुन्हा कॉल आला. हिंदू संघटनांना पाठिंबा दिल्यास परिणाम भोगण्याची तयारी ठेवा, असा इशारा कॉल करणाऱ्या व्यक्तीनं दिला.
माता न तू वैरिणी! दीड महिन्यांच्या लेकीचा आईनं गळा दाबला; डॉक्टरांनी CCTV पाहिले अन् मग…
वत्स यांनी नोंदवलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. सायबर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. वत्स यांना ज्या नंबरवरून धमकी आली, तो कोणाचा आहे याचा शोध घेतला जात आहे. आरोपींच्या अटकेसाठी विशेष पथकं तयार करण्यात आली आहेत, असं गाझियाबादचे वरिष्छ पोलीस अधीक्षक मुनीराज जी यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here