मुंबई: छोट्या पडद्यावरची ‘देवमाणूस’ ही मालिका कोणत्या ना कोणत्या कारणामुळं चर्चेत असायची. पहिल्या पर्वाला मिळालेल्या यशानंतर मालितेचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण या मालिकेवर प्रेक्षक नाराज असल्याचंही दिसून आलं. सोशल मीडियावर प्रेक्षक , नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. अखेर या मालिकेचं दुसरं पर्वही आता संपलं. मालिका संपल्यानंतर सर्वच कलाकारा भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
महाराष्ट्राच्या इच्छा होत्या त्या सगळ्या पूर्ण झाल्या… ‘देवमाणूस’ किरण गायकवाडची पोस्ट चर्चेत
सातारा जिल्ह्यात शूटिंग, बरेच कलाकाराही तिथल्या मातीतलेच. त्यामुळं प्रत्येकाला ही मालिका आपली वाटत होती. मालिकेची कथा काहीशी खटकणारी होती, पण कलाकार , लोकेशन्स अगदी खरे वाटायचे असं प्रेक्षक म्हणायचे. मालिका संपल्यानंतर कलाकारांसोबतच प्रेक्षकही भावुक झाले. सोशल मीडियावर कलाकार, प्रेक्षकांच्या पोस्ट व्हायरल होतायत. अभिनेता किरण गायकवाड यानंही अनेक पोस्ट शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्यात.आता मालिकेची निर्माती श्वेता शिंदे हिनं देखील एक खास पोस्ट शेअर केली आहे.

काय आहे श्वेता शिंदेची पोस्ट?
नेहमी एखाद्या मालिकेचं, नाटकाचं, चित्रपटाचं प्रमोशन करण्यात येणाऱ्या सर्वांच्या लाडक्या ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये आज पहील्यांदाच एका मालिकेचा निरोप समारंभ साजरा केला जाणार आहे. एका निर्मातीला आणि काय हवं? इतकं प्रेम, इतका लळा. ‘देवमाणूस २’ ह्या मालिकेद्वारे आम्हाला आज तुमचा निरोप घेताना ऊर भरून आलाय.
८०च्या दशकांत बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींना फक्त…मंदाकिनी यांचा मोठा गौप्यस्फोट
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एक असा टर्निंग पॉइंट येतो जो आपल्याला खूप काही देऊन जातो. झी मराठी वाहिनीवरील ‘देवमाणूस’ आणि ‘देवमाणूस २’ ह्या मालिका म्हणजे माझ्या आणि वज्र प्रोडक्शन्सच्या कारकिर्दीतील खरा टर्निंग पॉइंट ठरल्या. १०:३० च्या स्लॉटला स्वतःच वेगळं अस्तित्व निर्माण करत. कधी प्रेक्षकांचा रोष तर कधी प्रेक्षकांचे भरभरून प्रेम आम्ही अनुभवले. झी मराठी वाहिनीचा भक्कम आधार, मालिकेतील सर्वच गुणी कलाकारांचे आणि तांत्रिक विभागाचे सहाय्य आणि मायबाप प्रेक्षकांच्या आशीर्वादानेच आम्ही हा इतका मोठा पल्ला पार करू .
निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी,
चुकले आमचे काही, त्याची क्षमा असावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here