Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Sep 13, 2022, 5:29 PM
Love relationship Tragic end | उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ येथील राहणाऱ्या या प्रेमी युगुलाने टोकाचे पाऊल उचलले आहे. गणेश विद्यालयात मागील वर्षीच इयत्ता १२ वी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या प्रांजली भारत सुतार व विवाहित असलेल्या वाजिद चाँद इनामदार यांनी राहत्या घरात एका दोरीने गळफास घेतला. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

हायलाइट्स:
- सध्याच्या काळात लव्ह जिहादवरुन रान पेटले आहे
- धर्माच्या भीतीने त्या दोन प्रेमी जीवांनी आयुष्य संपवलं
उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ येथील राहणाऱ्या या प्रेमी युगुलाने टोकाचे पाऊल उचलले आहे. गणेश विद्यालयात मागील वर्षीच इयत्ता १२ वी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या प्रांजली भारत सुतार व विवाहित असलेल्या वाजिद चाँद इनामदार यांनी राहत्या घरात एका दोरीने गळफास घेतला.ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.दोघांचे शव सोलापुरातील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनसाठी दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांना मृतांकडे दोन चिठ्ठ्या आढळल्या
बीबी दारफळ येथे गळफास घेतल्याची माहिती मंगळवारी सकाळी ७ वाजता सोलापूर तालुका पोलीस ठाण्याला मिळाली.पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह खाली उतरविले त्यानंतर शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले.पोलिसांनी कसून तपास केला असता या प्रेमी युगुलाने आत्महत्या करण्यापूर्वी स्वतंत्र दोन चिठ्ठ्या लिहिल्या होत्या.त्या चिठ्ठ्या पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. ‘आमचं प्रेम समाजाला मान्य नाही… आमच्या आत्महत्येला कोणासही जबाबदार धरू नये’, असा मजकूर चिठ्ठीत लिहिल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत अधिक तपास तालुका पोलीस करत आहेत.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.