मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत तब्बल ४० आमदार आणि काही खासदार यांनी उठाव केल्यानंतर त्याचे पडसाद मोठ्या शहरापासून गावपातळीपर्यंत देखील उमटू लागले आहेत. अनेक ठिकाणी पदाधिकारी, कार्यकर्ते ठाकरे गटाला सोडून शिंदे गटात शामिल होत आहे. मनमाड शहरासोबत नांदगाव तालुक्यातील शिवसेना कार्यकर्ते दोन गटात विभागले गेले असून शिवसेना एक संघ असताना मयूर बोरसे हे गेल्या अनेक वर्षा पासून शहर प्रमुख पदाची जबाबदारी पार पाडत होते.
मयूर बोरसे यांच्यासोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते असून जनतेसाठी त्यांनी वेळोवेळी आंदोलने देखील केली आहेत. त्यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे एकच खळबळ उडाली असून आगामी काळात बोरसे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असून बोरसे यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.