अभिनेत्यानं पॅरिसचा एक फोटो शेअर केला आहे. त्यात अर्जुन काळ्या टी शर्टमध्ये आहे. डोक्यावर कॅप आहे. समोर मस्त ब्रेकफास्ट आहे. हा फोटो शेअर करत अर्जुन कपूरनं लिहिलं आहे, कोणी जास्त चांगला पोशाख घातला आहे? त्यानंतर तो म्हणतो, उजवकडे स्वाइप करा. मग माझं उत्तर मिळेल.
Video – मनिष पॉलनं केली मलायका अरोराच्या चालण्याची नक्कल
स्वाइप केल्यावर दिसते ती आकर्षक ड्रेसमधली मलायका अरोरा. मलायकाचं तर नेहमीच स्टाइल स्टेटमेंट असतं. तिच्या फॅशन्स, स्टाइल्स यासाठी ती प्रसिद्ध आहेच. अर्जुनच्या पोस्टवर मलायकानं लगेच उत्तर दिलं आहे. ती म्हणतेय, मीच. अनेक फॅन्सनी या फोटोंवर हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत. अनेकांना मलायकाचं उत्तर आवडलंय.
काही दिवसांपूर्वी दोघं पॅरिसला गेले होते. पॅरिसमध्ये दोघंही एकमेकांचे फोटो काढत होते. तिथे त्यांना रस्त्यावर कुणी ओळखत नाही. त्यामुळे बिनधास्त फिरण्याचा आनंद ते घेतला. जो त्यांना भारतात घेता येत नाही. खूप काम केल्यानंतर हा मोकळेपणा त्यांना रिलॅक्स करतो.

Kunal Rawal Pre-Wedding पार्टीत अर्जुन आणि मलायकाचा जलवा पाहायला मिळाला होता. मलायकाचा छैया छैया डान्स हिंदी सिनेमात अजरामर झाला. आता याच डान्सवर मलायका तुफान नाचली. फरक इतकाच की सिनेमात शाहरुख खान होता, आता पार्टीत अर्जुन कपूरबरोबर तिनं डान्स केला.
हा काय हिरो आहे का, अशी टीका लोक करतात; तेही अगदी समोर…प्रथमेश परब स्पष्टच बोलला
हा व्हिडिओ व्हायरल झाला. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर एकदम जवळ येऊन हा डान्स करत आहेत. मलायका-अर्जुन अगदी जोशात डान्स करताना दिसत आहे. अर्जुन ब्लॅक पोशाखात, तर मलायका नेहमीच्या ग्लॅमरस अवतारात आहे.
महाराष्ट्राची लाडकी जोडी रितेश जेनेलिया वांद्रयात जिम बाहेर स्पॉट
Good article. I absolutely appreciate this site. Keep it up!