पुणे : (दीपक पडकर) नागरिकांची कामे वेळेत व तत्पर्तने मार्गी लावण्यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार हे सकाळी सहा वाजल्यापासूनच आपला दिनक्रम सुरू करतात. आपली कामे घेऊन पुण्यासारख्या ठिकाणी जावे लागू नये म्हणून पवारांनी नागरिकांच्या सोयीसाठी जिल्हा स्तरावरील विविध कार्यालय बारामतीत उभारली आहे. मात्र, हीच कार्यालय असून अडचण नसून खोळंबा असा प्रत्यय बारामतीतील आरटीओ कार्यालयात नागरिकांना अनुभवायला मिळत आहे.

बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मेडद येथील फिटनेस ट्रॅक वरती वाहनांची तपासणी करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने राज्यपालांनी घालून दिलेल्या नियमानुसार सकाळी ९.४५ ते सायंकाळी सहा या वेळेपर्यंत उपस्थित राहणे अनिवार्य आहे. मात्र, येथील संबंधित अधिकारी वाहन तपासणीसाठी ट्रेकिंगवर वेळेत उपस्थित राहण्याचे कोणतेही बंधन पाळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बारामती, इंदापूर ,दौंड परिसरातून शेकडो वाहन चालक-मालक वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्रासाठी संबंधित अधिकाऱ्याची तासंतास वाट बघत ताटकळत बसत असल्याचे चित्र वारंवार दिसून येत आहे.

जूनपर्यंत प्रकल्प महाराष्ट्रात होता, मग सरकार बदलताच गुजरातला कसा गेला; आदित्य ठाकरेंचा सवाल
संबंधित अधिकारी ९. ४५ ला उपस्थित राहणे अपेक्षित असताना संबंधित अधिकारी दुपारी दोन नंतर आपल्या सोयीने वाहनांची तपासणी करण्यासाठी येत असल्याचे वाहन मालकांकडून सांगण्यात येत आहे. गाडी पासिंग करण्यासाठी सकाळी लवकर येऊन अधिकारी वेळेत येत नसल्यामुळे गाडी वेळेत पासिंग होत नाही. त्यामुळे आम्हाला दिवसभर उपाशी राहावेच लागते. शिवाय पूर्ण एक दिवस पासिंग कामासाठी वाया जात असल्याने आम्हाला आर्थिक फटका बसत असल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर वाहन मालकांनी सांगितले.

बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात बारामती, इंदापूर, दौंड हे तीन तालुके येतात. वाहन मालक, चालक आपल्या वाहनांची कामे करण्यासाठी जवळपास १०० किलो मीटरच्या अंतरावरुन बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात येत असतात. मात्र, अधिकारीच वेळेत उपस्थित राहत नसल्याने घालून दिलेल्या नियमानलाच हरताळ फासत असल्याचे दिसून येते. काही अधिकारी व कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्यामुळे बारामती, दौंड, इंदापूर या तीन तालुक्यातून आलेल्या वाहन मालक, चालक यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

उशीरा येणा-या संबंधित अधिकारी व कर्म-यांना वेळेत येण्याच्या सूचना दिल्या जातील. नागरिकांच्या काही समस्या असल्यास त्या तात्काळ सोडविल्या जातील. अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांनी मटाशी बोलताना दिली. सकाळी १० वाजता मी गाडी पासिंग करण्यासाठी आलो होतो. संबंधित अधिकारी दोन वाजता फिटनेस ट्रॅक वर आले. माझी गाडी जाणून बुजून फेल केली. व अरेरावीची भाषा करून माझा अपमान केल्याची माहिती राजेंद्र उपाध्ये यांनी दिली.
प्रेमाच्या आणाभाका घेतल्या पण धर्म आडवे आले; सोलापुरातील प्रेमीयुगुलाचा दुर्दैवी अंत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here