इंदापूर: सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी मंगळवारी कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील यांच्या सोळाव्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने इंदापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावेळी शहाजीबापू पाटील यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत जोरदार फटकेबाजी केली. मला चिंतन करायला नेहमीच आवडते. माझं आणि माझ्या पत्नीचं भांडण याचं मुद्द्यावरुन होतं असतं. मी घराच्या बाहेर वडाच्या झाडाखाली बसलो की,ती म्हणते उगाचचं येड्यावाणी बसलायं या की आत ! घोटाळा असा हाय की चिंतन ही काय दाखवायची वस्तू नायं.पण चिंतनातून मला असेच भासते की, आपल्या आयुष्यात काय असेल की लहानपणापासूनचं मला महान व्यक्तींचा सहवास लाभत गेला. त्यापैकीच एक म्हणजे कर्मयोगी शंकररावजी पाटील, अशा शब्दांत शहाजीबापूंनी कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला.

हर्षवर्धन पाटील लयं चिडकं.. शहाजी बापूंनी सांगितल्या बावड्यातील लहानपनीच्या आठवणी

वारकरी सांप्रदायाचा वारसा असणारे इंदापूर तालुक्यातील बावडा गावचे पाटील कुटुंबीय आमचे नातेवाईक असल्याने मी महिना महिना बावड्यात असायचो. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याबरोबर कबड्डी,लोमपाट खेळलोय यात अनेक वेळा भांडणं झाली. खेळात आम्ही खरं जिंकल्यालो असायचो पणं हर्षुभाऊ चिडकं पहिल्यापासून हारलं तरी आम्हाला बदाबदं मारायचं. लांबच्या लांब असलेलं आम्हाला काय ऐकणारयं काय ! ती चिडला की आम्ही पळतं सुटायचू मी तर एकदा भितीपोटी नारळाच्या झाडावरचं चढून बसलू अनं म्हणाले ये आता कसा वर येतोय बघतो, असं म्हणताचं उपस्थितांमध्ये एकचं हशा पिकला.

‘शिंदे साहेबांसाठी हार-पुष्पगुच्छ घ्यायला गेलो पण सगळं संपलं होतं’, शहाजीबापूंनी सांगितला ‘तो’ किस्सा
१९९५ साली हर्षवर्धन पाटलांना आमदार करण्यात बापुंचा हात

१९९५ साली मला सांगोल्यातून प्रथम उमेदवारी मिळाली. याच दरम्यान इंदापूर तालुक्यात देखील काँग्रेसमधून दुसऱ्या कोणालातरी उमेदवारी मिळणार होती. मात्र, मी लाला चांदणे नावाच्या मित्राला एका कानमंत्र दिला की हर्षवर्धन पाटील यांना अपक्ष उभे करा, असा सूर बैठकीत लाव आणि काम ओक्के झालं……१९९५ ला मी आणि हर्षवर्धन एकाच वेळी विधानसभेत गेलो. हर्षवर्धन पाटील आता तुम्ही पराभवाचे लय मनावर घेऊ नका माझ्यापेक्षा कमीचं अनुभव तुम्हाला आहे, असे शहाजीबापू यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

निवडणुकीत हार-जीत असते.पडाला हा शब्द राजकारणातून बाजूला करायला हवा.एखादा नेता पडला की पडला अशा चर्चेला उधाण येते. मी अशा चर्चा घडल्यावर स्वतःला पाहिलं की कुठे पडलो, काय झालं,कुठे लागलंय.अहो उभा आहे धडधाकटं आहे, असे शहाजीबापू पाटील यांनी म्हटले.

शहाजीबापू नौटंकी माणूस, फक्त विनोद करु शकतो विकास नाही: विनायक राऊत
‘शहाजीराव पाटलानं बैलापुढे नाचायला उषा चव्हाण आणली होती’

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे वडील स्वर्गीय शहाजीराव पाटील यांनी त्या काळी बैलपोळ्याला बैलांपुढे नाचायला उषा चव्हाण आणल्याचा किस्सा सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी इंदापूरमध्ये सांगितला. उषा चव्हाण नाचायच्या अनं मी देखील तिच्या अंगावर मेवा उधळायचो असा तो किस्सा होता. पणं दुसऱ्या दिवशी सकाळी कर्मयोगी शंकरराव पाटील यांनी माझा कान धरत, ‘अनं वागायचं नाही, तू हुशार पोरगा आहे’, असे म्हणत मला वेळीच सावध केले असेही शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

हर्षवर्धन पाटलांना न पडणारी १० हजार मते मिळवून नाही दिली तर राजाराम पाटलची औलाद नाय – शहाजी पाटील

उद्या होणाऱ्या लोकसभा किंवा विधानसभेला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना न पडणारी दहा हजार मते मी फक्त पाच सभांमध्ये मिळवून देईन. अन्यथा राजाराम पाटलची औलाद नायं असं जाहीर वक्तव्य सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी इंदापूरात केले. कर्मयोगी शंकरराव पाटील यांचं स्वप्न साकार करण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांना घवघवीत मताधिक्याने विजयी करावं त्यासाठी भाषणाला मी येतो काळजी करू नका, असे शहाजीबापू पाटील यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here