मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या चर्चेत आहे. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत पाठोपाठ पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाहमुळे रौतेला चर्चेत आली. गेल्या काही महिन्यांपासून ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांच्यात वाद सुरू आहे. मात्र आता या वादात उर्वशी बॅकफूटवर आल्याचं दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी उर्वशीनं ऋषभ पंतला छोटू भय्या म्हटलं होतं. ‘छोटू भय्याला बॅट बॉल खेळायला हवं. तुझ्यासाठी बदनाम व्हायला मी काही मुन्नी नाही. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा,’ असं उर्वशीनं पोस्टमध्ये म्हटलं होतं. उर्वशीची पोस्ट बघता बघता व्हायरल झाली. कधीकाळी उर्वशी आणि ऋषभ पंतच्या अफेअरच्या चर्चा असताना उर्वशीनं ऋषभला थेट रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत त्याचा उल्लेख छोटू भय्या केल्यानं तिची पोस्ट चर्चेचा विषय ठरली.
अर्जुन कपूर विचारतोय चांगला पोशाख कोणाचा? मलायकानं दिलं पटकन उत्तर
आता उर्वशी रौतेलानं ऋषभ पंतची माफी मागितली आहे. आरपीला एखादा मेसेज द्यायचा आहे का, असा प्रश्न उर्वशीला एका मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर सिधी बात नो बकवास. त्यामुळे मी कोणतीही बकवास करणार नाही, असं उत्तर उर्वशीनं दिलं. तुम्हाला ऋषभला काही सांगायचं आहे का, माफ करा अन् विसरा असं तुम्हीच म्हटलं होतं. त्यामुळे तुम्हाला त्याच्यापर्यंत काही मेसेज पोहोचवायचा आहे का, असं मुलाखतकर्त्यानं विचारलं. त्यावर मला काहीच बोलायचं नाही असं म्हणत उर्वशीनं हात जोडत पंतची माफी मागितली. सॉरी, आय ऍम सॉरी म्हणत तिनं विषय संपवण्याचा प्रयत्न केला.
७५ रुपयात ब्रह्मास्त्र पाहण्याचा विचार आहे तर थोडं थांबा! १६ सप्टेंबर नव्हे आता या दिवशी मिळेल स्वस्त तिकिट
वादाची सुरुवात कुठून झाली?

उर्वशीनं एका मुलाखतीत केलेल्या विधानांमुळे वादाला सुरुवात झाली. एका व्यक्तीनं हॉटेलच्या लॉबीमध्ये १० तास माझी वाट पाहिली होती, असा दावा उर्वशीनं केला. यानंतर पंतनं इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून उर्वशीवर निशाणा साधला. बहिणी, माझी पाठ सोड, असं पंतनं स्टोरीमध्ये लिहिलं होतं. मात्र ही स्टोरी त्यानं काही वेळात डिलीट केली. यानंतर उर्वशीनं पंतचा उल्लेख छोटू भय्या असा केला. मात्र आता तिनं पंतची माफी मागितली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here