Maharashtra project Investment | तीन महिन्यांपूर्वी दिल्लीत ‘फॉक्सकॉन’चे अध्यक्ष तैवानवरुन आले होते. त्यावेळी आम्ही त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यांना कोणत्या सवलती, कोणत्या सुविधा द्यायच्या यावर चर्चा झाल्यानंतर त्यांनी तळेगाव हे ठिकाण अंतिम केले होते. केवळ कागदोपत्री व्यवहार बाकी होता. हा उद्योग महाराष्ट्राच्यादृष्टीने खूपच फायद्याचा होता. यामुळे इतर अनेक उद्योगांना फायदा झाला असता.

हायलाइट्स:
- हा प्रकल्प राजकीय दबावापोटी गुजरातमध्ये नेण्याचा घाट
- हा प्रकल्प गुजरातमधील धोलेरा येथे प्रस्तावित
- महाराष्ट्रातील तळेगांवच्या तुलनेत ही जागा प्रकल्पाच्या उभारणीसाठी अगदीच सामान्य
मात्र, या भेटीनंतर अजित पवार यांनी फेसबुक पोस्ट करत या सगळ्या प्रकाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. तळेगांव येथील कंपनीच्या उभारणीसाठी आवश्यक असणारे इकोसिस्टिम, ऑटोमोबाईल व इलेक्ट्रीक हब, रस्ते, रेल्वे व एअर कनेक्टीव्हिटी, ‘जेएनपीटी’ बंदराशी असणारी कनेक्टीव्हिटी, उपलब्ध असणारे तांत्रिक मनुष्यबळ व महाराष्ट्र राज्याचे गुंतवणूक धोरण हे पोषक असल्यानं वेदांत ग्रुपनं तळेगांव येथील एक हजार एकर जागेची निवड केली होती. मात्र राज्यात सत्तांतर होताच महाराष्ट्राच्या हिताचा असणारा हा प्रकल्प राजकीय दबावापोटी गुजरातमध्ये नेण्याचा घाट घातला जात आहे. हा प्रकल्प गुजरातमधील धोलेरा येथे प्रस्तावित केला असून महाराष्ट्रातील तळेगांवच्या तुलनेत ही जागा प्रकल्पाच्या उभारणीसाठी अगदीच सामान्य आहे. महाराष्ट्राची गुंतवणूक गुजरातकडे नेण्याचा प्रयत्न असून महाराष्ट्राला आर्थिक मागास करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे राज्याचे ‘जीएसटी’चे सुध्दा मोठे नुकसान होईल, अशी शक्यता अजित पवार यांनी बोलून दाखवली.
वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पामुळे महाराष्ट्रात दोन लाख कोटींची गुंतवणूक होणार होती. दीड लाख जणांना रोजगार उपलब्ध करुन देणारा ‘वेदांता’ ग्रुपचा सेमीकंडक्टर व डिस्पले फॅब्रीकेशनचा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याच्या हालचाली सुरु आहेत. महाराष्ट्रासाठी हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून राज्याच्या औद्योगिक प्रगतीला बाधा आणणारा आहे. महाराष्ट्राच्या औद्योगिक धोरणावर याचा दीर्घकालीन परिणाम होईल, अशी भीती अजित पवार यांनी व्यक्त केली.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Good article. I absolutely appreciate this site. Keep it up!