Authored by किशोर पाटील | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Sep 13, 2022, 8:48 PM

Jalgaon News : जळगाव शहरातील कांचन नगरमध्ये एका ७४ वर्षीय वृद्धाचा विचेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. टेबल फॅन सुरू करताना विजेचा धक्का लागला आणि शॉक लागला.

 

Jalgaon News
Jalgaon News : टेबल फॅनमुळे वृद्धाचा गेला जीव; पाहा घडलं तरी काय…

हायलाइट्स:

  • वीजेच्या धक्क्याने ७४ वर्षीय वृध्दाचा मृत्यू
  • शनीपेठ पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
  • जळगावातील कांचन नगरमधील घटना
जळगाव : टेबल फॅन सुरू करताना वीजेचा धक्का लागून एका वृध्दाचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना आज मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील कांचन नगरात घडली. रतन निना साळुंखे (वय ७४) रा. कांचन नगर, जळगाव असे मयत झालेल्या वृध्दाचे नाव आहे.

रतन साळुंखे हे रेल्वेचे सेवानिवृत्त कर्मचारी होते. रतन साळुंखे हे फॅन चालू करण्यासाठी गेले. यावेळी बटन सुरू करत असतांना त्यांना फॅनचा जोरदार धक्का बसला. यात त्यांचा मृत्यू झाला. पंख्यासह ते खाली पडले. जोराचा आवाज आल्याने रतन साळुंखे यांचे शेजारी धावत आले. यावेळी रतन साळुंखे हे खाली पडलेल होते. तर त्यांच्या उजव्या हाताला जखम झाली होती. विजेचा धक्का लागल्याचे लक्षात आल्यावर त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
सायरस मिस्त्री अपघात प्रकरणी नवे अपडेट: कारची होणार पुन्हा तपासणी, तज्ज्ञांची टीम हाँगकाँगवरून दाखल
रतन साळुंखे हे कांचन नगरात एका पार्टेशनच्या खोलीत एकटे राहत होते. तर त्यांचं कुटुंब घरासमोर राहतात. मंगळवारी सांयकाळी ५ वाजेच्या सुमारास ते घरात टेबल फॅन सुरू करण्यासाठी उभे राहिले असता. यादरम्यान त्यांचा हात पंख्याला लागताच विजेचा जोरदार धक्का बसला. त्यावेळी ते खाली कोसळले होते. त्यांच्या हाताला जखमा झाल्या. शेजारच्या नागरिकांनी तात्काळ धाव घेतली आणि रतन साळुंखे यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राची सुरतवाला यांनी त्यांना मयत घोषित केले. या संदर्भात शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत रतन साळुंखे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली ,सुना असा परिवार आहे.
विश्वचषकातील पराभव टाळण्यासाठी रोहित शर्माची मोठी खेळी; संघ निवडताना खेळली मोठी चाल…

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here