मुंबई : पुण्यातील तळेगाव येथे नियोजित असलेला वेदांत आणि फॉक्सकॉन या कंपनीचा प्रकल्प गुजरात राज्यात गेल्यामुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. गुजरात सरकारने वेदांत आणि फॉक्सकॉन या कंपनीशी करार केला असून त्याद्वारे गुजरात राज्यात १ लाख ५४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे. या गुंतवणुकीद्वारे गुजरात राज्यात सेमीकंडक्टर प्रकल्प उभा राहणार असून यातून रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत. यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून वेदांत कंपनीसोबत असलेल्या फॉक्सकॉन या कंपनीचे नाव चर्चत आले आहे. या फॉक्सकॉन कंपनीबाबत माहिती मिळवण्यासाठी लोकांमध्ये उस्तुकता असून ही कंपनी कोणत्या क्षेत्रात काम करते यावर टाकलेला हा प्रकाशझोत. (a to z information about foxconn, which has signed a deal to set up a semiconductor project in gujarat)

फॉक्सकॉन या कंपनीचे नाव सेमीकंडक्टर निर्मितीच्या जागात अग्रक्रमाने घेतले जाते. फॉक्सकॉनने वेंदात कंपनीसह भारतात काही प्रकल्पांसाठी करार केलेले आहेत. या दोन कंपन्या एकत्रितपणे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात काम करत आहे. हे सामान्यतः एकात्मिक सर्किट्स किंवा मायक्रोचिप म्हणून ओळखले जातात. या मायक्रोचिप सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये आढळतात. यात सेल फोन, कार आणि लॅपटॉपसह सर्वच इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा समावेश आहे. या मायक्रोचिप्स आता आधुनिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहेत.

जूनपर्यंत प्रकल्प महाराष्ट्रात होता, मग सरकार बदलताच गुजरातला कसा गेला; आदित्य ठाकरेंचा सवाल
स्मार्टफोनची निर्मिती करणारी जगातील अव्वल कंपनी

फॉक्सकॉन ही कंपनी तैवानमधील एक अग्रगण्य कंपनी आहे. जगप्रसिद्ध ब्रँड अ‍ॅपल, सॅमसंग, सोनी आणि एचपीसह अनेक मोठ्या कंपन्यांसाठी स्मार्टफोनची निर्मिती करणारी फॉक्सकॉन ही अव्वल कंपनी आहे.

फॉक्सकॉन या कंपनीत १० लाखांहून अधिक कर्मचारी रात्रंदिवस काम करतात. हे कर्मचारी २४ तासांपेक्षा कमी वेळेत हजारो स्मार्टफोन तयार करतात. यावरून या कंपनच्या विशालतेचा अंदाज सहज लावला जावू शकतो. उत्कृष्ट स्मार्टफोन उत्पादनामुळे फॉक्सकॉन ही कंपनी जगभर प्रसिद्ध आहे.

फॉक्सकॉन या कंपनीचे मुख्यालय तचुंग, न्यू तैपेई, तैवान येथे आहे. फॉक्सकॉन ही एक बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ही कंपनी प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची निर्माता म्हणून ओळखली जाते. या कंपनीचे खरे नाव Hon Hai Precision Industry Co. Ltd. असे आहे. परंतु, जगभरात कंपनीची फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुप म्हणून ओळखला जातो. ही कंपनी स्मार्टफोन, कॉम्प्युटर चिप्स इत्यादींची निर्मिती करणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. फॉक्सकॉन कंपनी अनेक प्रमुख स्मार्टफोन आणि संगणक ब्रँडचे भाग आणि उत्पादने तयार करते. फॉक्सकॉन ही तैवानची सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान कंपनी आहे.

जुहूतील भूखंडाची किंमत गगनात, मुंबईत ३३२ कोटींचा विक्री व्यवहार
टेरी गौ आहेत फॉक्सकॉनचे संस्थापक

फॉक्सकॉनचे संस्थापक टेरी गौ हे आहेत. त्यांनी कंपनी २० फेब्रुवारी १९७ रोजी तैवानमध्ये Hon Hai Precision Industry Co., Ltd अशा नावाने सुरू केली. सध्या या कंपनीची फॉक्सकॉन अशीच ओळख आहे. फॉक्सकॉन ही जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक उत्पादन सेवा देणारी कंपनी आहे. विशेष म्हणजे ही कंपनी जगातील जवळजवळ सर्वच देशांमध्ये आपली उत्पादने तयार करते आणि त्यांची विक्रीही करते. ही कंपनी जगातील अनेक आघाडीच्या कंपन्यांसाठी स्मार्टफोन आणि संगणकाचे भाग आणि उपकरणे तयार करण्याचे काम करते.

‘आयटी’ क्षेत्रात मंदीचे संकट; भारतीय टेक कंपनीने जगभरात केली कर्मचाऱ्यांची मोठी कपात
काय आहे फॉक्सकॉन कंपनीचा इतिहास?

टेरी गौ यांनी सन १९७४ मध्ये फॉक्सकॉन कंपनीची स्थापना केली. ही कंपनी पहिली इलेक्ट्रिक पार्ट्स उत्पादक कंपनी आहे. त्यानंतर फॉक्सकॉनची सुरुवात Hon Hai Precision Industry Co. Ltd या नावाने झाली. फॉक्सकॉन या कंपनीचा पहिला उत्पादन कारखाना सन १९८८ मध्ये चीनमधील शेन्झेन येथील लाँगहुआ सिटी येथे सुरू झाला. इंटेलने मदरबोर्ड बनवण्यासाठी फॉक्सकॉनची निवड केल्यानंतर फॉक्सकॉनला सर्वात मोठे यश मिळाल्याचे सांगितले जाते. अशा प्रकारे कंपनीने आणखी एक नवीन प्लांट सुरू केला. सध्या फॉक्सकॉन या कंपनीचे जाळे जगभर पसरले असून ही कंपनी जगातील विविध देशांमध्ये उत्पादन क्षेत्रात आघाडीवर आहे. जगातील आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरण कंपन्यांसोबत भागीदारी करून ही कंपनी मोठे प्रकल्प यशस्वीपणे राबवत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here