Heavy Rain Forecast : मंगळवारी रायगड, रत्नागिरी आणि सातारा या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर दुसरीकडे राज्यात पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि पुणे या जिल्हयात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

 

heavy to very heavy rain forecast for next 4 days in ratnagiri district
रत्नागिरीकरांसाठी महत्त्वाची बातमी; पुढील चार दिवस अतिमुळधार पावसाची शक्यता
रत्नागिरी : १३ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२२ दरम्यान रत्नागिरी जिल्हयात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. हे लक्षात घेता जनतेने सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने केले आहे. आज जिल्हयात दापोली, खेड, चिपळूण आदी ठिकाणी सोमवारी दिवसभर मुसळधार पाऊस सुरु होता. (Heavy to very heavy rain forecast for next 4 days in Ratnagiri district)

मुंबई वगळता राज्यभरात पावसाची तुफान बॅटिंग सुरू असून, तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

क्लिक करा आणि वाचा- अनिल परब यांच्या अडचणी वाढणार?; ३० दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

मंगळवारी रायगड, रत्नागिरी आणि सातारा या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर दुसरीकडे राज्यात पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि पुणे या जिल्हयात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

क्लिक करा आणि वाचा- गुहागर येथे दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, अपघातात तब्बल ४१ जण जखमी, पाहा यादी

कोकणात पुन्हा पाऊस सक्रिय झाला असून काही दिवस पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत होता. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुढे निर्माण होऊ नये त्यासाठी पाऊस आवश्यक होता.

क्लिक करा आणि वाचा- उदय सामंत यांना पोलिसांसमोरच जाळून ठार मारण्याची धमकी; रत्नागिरीत खळबळ

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here