पुणे : पुण्यातील हडपसरजवळील शेवाळेवाडीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शेवाळेवाडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ असलेल्या अभिनंदन क्रिस्टल टॉवर या इमारतीमध्ये मंगळवारी सायंकाळी सात वाजल्याच्या सुमारास दोन मैत्रिणींनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आकांक्षा औदुंबर गायकवाड (वय १९) आणि सानिका हरिश्चंद्र भागवत (१९) असं आत्महत्या केलेल्या मैत्रिणीची नावं आहेत. दोघींनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
एवढ्या कोवळ्या वयात दोन मैत्रिणींचा असा शेवट झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आकांक्षाने राहत्या घरातच गळफास लावून घेतल्याने तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. तर पोलीस या घटनेचा तपास करत असल्याची माहिती आहे.