मुंबई: वेदांत आणि फॉक्सकॉन महाराष्ट्रात १.५८ लाख कोटी रुपयांती गुंतवणूक करणार होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ९०% चर्चाही केली होती. पण सरकार बदलताच हा प्रकल्प गुजरातला कसा गेला, याचे नेमके गौडबंगाल काय हे जनतेला कळाले पाहिजे. महाराष्ट्र हे गुंतवणुकदारांच्या पहिल्या पसंतीचे राज्य आहे. मविआ सरकारने अडीच वर्षांच्या काळात मोठी गुंतवणूक राज्यात आणली व त्यातून राज्यातील लाखो तरुणांच्या हाताला काम दिले. परंतु मविआ सरकार जाताच अडीच महिन्यात असे काय झाले की फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला?, असा सवाल ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शिंदे-फडणवीसांना विचारला.

फॉक्सकॉन-वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा? असा सवाल उपस्थित करत हा प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याची कोणतीच माहिती राज्य सरकारला समजली नाही का? हा प्रकल्प महाराष्ट्रातच रहावा यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने काय प्रयत्न केले?, असे सवालही बाळासाहेब थोरात यांनी विचारले आहेत.

मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यासाठी BJP व केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आले आहे. फडणवीस सरकार राज्यात असताना मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्रही गुजरातला हलवण्यात आले. अनेक महत्वाचे प्रकल्प व कार्यालयेही गुजरातला हलवण्यात आली, याकडेही बाळासाहेब थोरात यांनी लक्ष वेधले.

फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला का गेला? उद्धव ठाकरेंवर खापर फोडत एकनाथ शिंदे म्हणाले..
बुलेट ट्रेनची गरज नसतानाही महाराष्ट्राच्या माथी हा प्रकल्प लादला गेला. आता पुन्हा महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जात आहेत याचे गांभीर्य या सरकारला नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्कार सोहळे व देवदर्शनात व्यस्त आहेत. त्यांनी थोडे लक्ष राज्याच्या कामकाजात दिले असते तर एवढा मोठा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून गेला नसता, अशा शब्दात राज्याच्या कारभाऱ्यांचे कान टोचले आता गुंतवणूकही गेली आणि लाखो रोजगारही गेले. हे का झाले? याचा खुलासा सरकारने करावा.

** ‘वेदांत’ आणि ‘फॉक्सकॉन’ प्रकल्प

अहमदाबाद जिल्ह्यात एक हजार एकर जागेवर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी ‘वेदांत’ची गुंतवणूक ६० टक्के असेल, तर ‘फॉक्सकॉन’ची गुंतवणूक ४० टक्के असणार आहे. या प्रकल्पातून पुढील दोन वर्षांत सेमीकंडक्टरचे प्रत्यक्ष उत्पादन सुरू होईल, असे ‘वेदांत’चे अध्यक्ष अनिल अगरवाल यांनी सांगितले. गुजरात सरकारसमवेत करारावर स्वाक्षरी केल्यानंतर ते बोलत होते.

Raj Thacekray: महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये जातोच कसा? राज ठाकरेंचा परखड सवाल
गेल्या वर्षी सेमीकंडक्टरची मोठी टंचाई देशात निर्माण झाली होती. याचा फार मोठा फटका वाहन उद्योगाला बसला होता. सेमीकंडक्टर चीन आणि तैवान येथून आयात केले जातात. या दोन्ही देशांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी देशात सेमीकंडक्टरचे उत्पादन होणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक सवलत योजना आणली होती. यामध्ये उत्पादनसंलग्न सवलत योजनाही (पीएलआय) लागू करण्यात आली होती. याचा फायदा घेऊन सेमीकंडक्टर उत्पादन करण्यासाठी वेदान्त-फॉक्सकॉन यांनी संयुक्त अर्ज केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here