Pune Crime News: वारजे भागात राहणाऱ्या ज्येष्ठ महिलेवर तीक्ष्ण शस्त्राने वार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. ऑनलाइन लोन ॲपवरील कर्ज फेडण्यासाठी नातीनेच आजीचा खून केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. (Pune Crime)

 

mother

हायलाइट्स:

  • वृद्ध महिलेच्या खुनाचा छडा
  • उशीने तोंड दाबून घोटला गळा
  • नातीला पोलिसांनी केली अटक
पुणेः वारजेतील आकाशनगर परिसरात झालेल्या एका ज्येष्ठ महिलेच्या खुनाचा वारजे पोलिसांनी छडा लावला आहे. लोनॲपवरून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी नातीनेच आजीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी रात्री उशीरा पोलिसांनी गौरी सुनील डांगे (वय.२४) या नातीला ताब्यात घेतले आहे. तर सुलोचना सुभाष डांगे (वय.६५ ,रा.शुभम कॉलनी लेन क्रमांक दोन) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. वारजे येथील आकाशनगर परिसरात डांगे, त्यांचा मुलगा आणि नात राहतात. त्यांचा मुलगा सुतारकाम करतो आणि नात नोकरी करते. डांगे मंगळवारी एकट्या घरात होत्या. पाण्याची मोटार सुरू होत नसल्याने सायंकाळी सहाच्या सुमारास एक भाडेकरूने डांगे यांना हाक मारली. मात्र डांगे यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे भाडेकरू त्यांच्या घरात गेला. तेव्हा डांगे फरशीवर पडल्याचे आढळून आले. भाडेकरूने डांगे यांच्या मुलाला याबाबत कळवले. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती कळविण्यात आली.

वाचाः ज्या मंदिरात पूजा करायचे तिथेच संपवले जीवन; हिंगोलीत पुजाऱ्याची आत्महत्या, सुसाइड नोट चर्चेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरी हिने लोनॲपद्वारे कर्ज घेतले होते. कर्ज फेडण्यासाठी तिला वारंवार कंपनीकडून तगादा लावण्यात येत होता. त्यातूनच तिने मंगळवारी सकाळी आजीचा खून करून घरात चोरी झाल्याचा बनाव रचला. आजी घरात एकटी असताना उशीने तोंड दाबून तिचा गळा घोटला. त्यानंतर हातावर वार केले. आजीचे सोने घेऊन तिने घराबाहेर पळ काढला होता. तपासादरम्यान पोलिसांना मुलगा आणि नातीवर संशय होत. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके, पोलिस उपनरीक्षक नरेंद्र मुंढे यांच्या पथकाने मुलीकडे पोलिसी खाक्या दाखवून तपास केला असता. नातीने आजीच्या खुनाची कबुली दिली. लोनॲप वरुन घेतलेले कर्ज फेडण्यासाठी संबंधीत व्यक्तीला अनेकदा ब्लॅकमेल करून त्यांची बदनामी केली जाते आहे. त्यातूनच हा गंभीर प्रकार घडला असून नातीने आपल्या आजीचा खून केला.

वाचाः भावाविरोधात साक्ष दिली; जवानाने व्यावसायिकाच्या डोक्यात गोळी झाडली

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here