भारत हा जगातील सर्वात मोठा पाम तेल आयातदार देशांपैकी एक आहे. त्यामुळे देशातील खाद्यतेलाचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. त्याचवेळी सर्वात मोठा उत्पादक असलेल्या इंडोनेशियाला इन्व्हेंटरी कमी करण्यात मदत केली जाईल. ऑगस्टमध्ये भारताने ९९४,९९७ टन पाम तेलाची आयात केली होती, तर जुलैमध्ये ५३०,४२० टन होती. याशिवाय सप्टेंबरमध्ये भारत १ दशलक्ष टन पामतेल आयात करेल असे मानले जात आहे.
दुसरीकडे, उर्वरित खाद्यतेलापेक्षा पाम तेल स्वस्तात उपलब्ध असल्याने कंपन्यांनी आक्रमकपणे पामतेल आयात केले आहे. त्याचवेळी भारतात सध्या सणासुदीचा हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे लग्नसराईचा हंगामही जवळ येत असू अशा परिस्थितीत पामतेलाची मागणी वाढू शकते. सरकारने पामतेलाच्या आयातीवर ५.५ टक्के कर लावला आहे. त्याचबरोबर सोया तेल आणि सूर्यफूल तेलाची आयात चालू आणि पुढील वर्षासाठी शुल्कमुक्त करण्यात आले आहे.
भारत इतर देशांतून जे खाद्यतेल आयात करतो, त्यात पाम तेलाचा वाटा सर्वाधिक आहे आणि हा आकडा सुमारे ६० टक्के आहे. तर सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलाचा वाटा अनुक्रमे २५ आणि १२ टक्के आहे.
ऑगस्टमध्ये पाम तेलाचा साठा ३३ महिन्यांच्या उच्चांकावर
ऑगस्टच्या अखेरीस मलेशियातील पाम तेलाचा साठा ३३ महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचला असल्याचे आकडेवारीवरून असे दिसून येत आहे. मागणीत सतत वाढत हे यामागचे मुख्य कारण आहे.