नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून धक्का तंत्र चालूच आहे. देण्याचे काम चालूच असून शिंदे गटाने नाशिकमध्ये शिवसेनेला पुन्हा एकदा धक्का दिला आहे. नाशिकच्या मनमाड नंतर इगतपुरीत तालुक्यात शिवसेनेला मोठे भगदाड पडले आहे. शिवसेनेच्या चाळीस आमदारांनी वेगळी भूमिका घेत महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर पडत राज्यात भाजपसोबत सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर आता शिवसेनेत दोन गट तयार झाले आहेत.

अनेक शिवसैनिक कार्यकर्ते आता ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहेत. शिवसेनेतील आमदारांपाठोपाठ खासदार अनेक नगरसेवक सरपंच शिंदे गटात प्रवेश करत आहेत आता संघटनात्मक पातळीवर देखील शिवसेनेला खिंडार पडत आहे अनेक शिवसेना पदाधिकारी युवा सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत

एकनाथ शिंदेंची हिंदू गर्व गर्जना यात्रा, आमदारांकडून भगवी शाल अन् १ हजार रुद्राक्षांची माळ भेट
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात माजी आमदार पांडुरंग गांगड, माजी सभापती संपत काळे यांच्या सह इगतपुरी तालुक्यातील आजी माजी ३५ सरपंच युवा सेना पदाधिकारी, शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता इगतपुरी तालुक्यात उद्धव ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे धक्का तंत्र चालूच असून शिंदे गटातील येणाऱ्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. नाशिक जिल्ह्यातील खासदार हेमंत गोडसे, मंत्री दादा भुसे आणि आमदार सुहास कांदे या बड्या नेत्यांच्या व्यतिरिक्त शिवसेनेला नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खिंडार पडलेली नव्हती परंतु आता आगामी काळातील निवडणुका पाहता नाशिक जिल्ह्यातही शिवसेनेला गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे.

ग्रामीण भागातील अनेक शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते सरपंच हे शिंदे गटात प्रवेश करत आहेत. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील शिवसेनेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नाशिकचे खासदार हेमंत गोडसे माजी आमदार काशिनाथ मेंगाळं यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथिगृहावर शिंदे गटात प्रवेश केला.
गुजरातच्या समुद्रात पाकिस्तानी बोट; कारवाई करताच समोर आलं पंजाब कनेक्शन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here