man sets fire on mercedes car: उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये एका मिस्त्रीनं कामाचे पैसे न मिळाल्यानं धक्कादायक कृत्य केलं. मिस्त्रीला एका घरात टाईल्स लावण्याचं काम मिळालं होतं. मात्र त्याला कामाचे पूर्ण पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे संतापलेल्या मिस्त्रीनं पैसे न देणाऱ्या व्यक्तीची मर्सिडीज कार पेटवली.

 

car on fire
नोएडा: उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये एका मिस्त्रीनं कामाचे पैसे न मिळाल्यानं धक्कादायक कृत्य केलं. मिस्त्रीला एका घरात टाईल्स लावण्याचं काम मिळालं होतं. मात्र त्याला कामाचे पूर्ण पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे संतापलेल्या मिस्त्रीनं पैसे न देणाऱ्या व्यक्तीची मर्सिडीज कार पेटवली. कारवर पेट्रोल टाकून तिला आग लावल्यानंतर मेस्त्री तिथून फरार झाला. सदरपूर परिसरातील सेक्टर-३९ मध्ये ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मिस्त्री बाईकवरून येताना दिसतो. त्यानं हेल्मेट घातलेलं आहे. बाईकवरून उतरून तो मर्सिडीजजवळ जातो. कारला आग लावतो. त्यानंतर बाईकवर बसून फरार होतो. मिस्त्रीनं कार मालकाच्या घरात टाईल्स लावण्याचं काम घेतलं होतं. मात्र मालकानं पूर्ण पैसे दिले नाहीत. मिस्त्रीनं वारंवार पैशांसाठी विचारणा केली. मात्र तरीही मालकानं पैसे दिले नाहीत.
सोन्याचे कानातले खेचून निघाले नाहीत, चोरट्यांचे कटरनं वार; भाजप आमदाराच्या आईचे कान कापले
मालक पैसे देत नसल्यानं मिस्त्री संतापला. तो मालकाच्या घरी पोहोचला. घराबाहेर मालकाची मर्सिडीज कार उभी होती. भडकलेल्या मिस्त्रीनं कारला आग लावली. याआधी अशीच एक घटना सहारणपूरमध्ये घडली. जे. जे. पुरम वसाहतीमधील एका घराबाहेरील कार पेटवून देण्यात आली होती. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून तीन तरुणांना अटक केली. २२ जूनला ही घटना घडली.
तुझे तसले फोटो माझ्याकडे आहेत! धमकावून महिलांना न्यूड कॉल करायला लावले; ट्रक चालकाचा प्रताप
सुमेर चंद यांच्या घराबाहेर उभी असलेल्या कारनं अचानक पेट घेतला. ही घटना समजताच घरातील सदस्य बाहेर आले. मात्र बाहेर कोणीही नव्हतं. कारमध्ये कोणतीही तांत्रिक अडचण नसताना अचानक तिला आग लागल्यानं संशय वाढला. चंद यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. यानंतर तीन तरुणांना अटक करण्यात आली.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here