नोकरी सोडल्यानंतरही कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देण्याचे हे अनोखे धोरण एका अमेरिकन मार्केटिंग एजन्सीमध्ये लागू करण्यात आले आहे. किंबहुना जो कर्मचारी राजीनामा देतो, त्याला बाहेर पडतानाही चांगले वातावरण मिळावे आणि त्याने आनंदाने कंपनी सोडावी, हाच यामागचा उद्देश आहे, आणि त्याच्या मनात कोणतीही कटकटीची भावना नसावी.
धोरण कसे काम करते
हे धोरण गोरिला (Guerilla) नावाच्या मार्केटिंग एजन्सीमध्ये लागू आहे. कंपनीचे संस्थापक जॉन फ्रँको (Jon Franko) यांनी एका लिंक्डइन पोस्टमध्ये त्यांच्या कंपनीच्या या धोरणाबद्दल सांगितले. त्यांनी म्हटले की, “एखाद्या कर्मचाऱ्याने आमची गोरिला फर्म सोडण्याचा निर्णय घेतो आणि कंपनीला याबाबत माहिती देतो तेव्हा वेगवेगळ्या मार्गाने त्याचे मन वळवून रोखण्याचा कोणताही प्रयत्न केला जात नाही, या उलट अशा कोणत्याही पूर्णवेळ कर्मचाऱ्याला ज्याने किमान सहा आठवड्यांचा नोटीस कालावधी पूर्ण केला असेल त्याला त्याच्या उर्वरित वेळेत १०% पगारवाढ दिली जाते. पण या काळात आम्ही त्यांना वाढीव पगारासह तीन महिन्यांची नोटीस बजावण्यास सांगत आहोत.
या धोरणाचा उद्देश काय?
जॉन फ्रॅंको यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे या कंपनीच्या धोरणाबद्दल आणि त्याच्या उद्देशाबद्दल स्पष्ट भाष्य केले. त्यांनी लिहिले की, असे करून आम्ही आमच्या कर्मचार्यांना वेगळी वागणूक देण्यात प्रयत्न करतो, जेणेकरून त्यांना ते चुकीच्या ठिकाणी असल्याचे जाणवू नये. याशिवाय या धोरणाच्या मदतीने पुढे जाण्यासाठी सज्ज होण्याची संधीही मिळते. ते म्हणाले, आमचे संपूर्ण लक्ष आम्हाला सोडून जाणार्या कर्मचार्याला अजिबात वाईट वाटू नये याकडे असते.
बदलांना सोप्पे करण्याचा अभियान
कंपनीचे संस्थापक जॉन फ्रॅन्को यांनी पुढे कंपनी सोडलेल्या एका कर्मचाऱ्याचे उदाहरण दिले. त्यांनी लिहिले की, कर्मचारी राजीनामा देण्यासाठी आमच्याकडे आला आणि तीन महिन्यांत निघून जाईल असे सांगितले. यानंतर आम्ही त्याच्या पगारात १० टक्के वाढ केली आणि त्यासोबतच त्याच्या जागी काम करण्यासाठी योग्य उमेदवाराची शोध मोहीमही तीव्र केली. यादरम्यान त्याच्या जागी दुसरा कर्मचारी आला आणि निघणारा कर्मचारीही आनंदाने निघून गेला. यामुळे बदल खूप सोपा झाला.
फ्रँको पुढे म्हणाले की, कोणत्याही कर्मचाऱ्याने आम्हाला सोडून जावे अशी आमची इच्छा आहे. पण आमच्या कंपनीतून प्रत्येक कर्मचारी निवृत्त होईल, असा विचार करणे नक्कीच मूर्खपणाचे ठरेल. आपण शक्य तितके सोपे बदल करण्याचा प्रयत्न करू शकतो.