नवी दिल्ली: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली केल्या काही कालावधीपासून फॉर्ममध्ये नव्हता. पण आशिया कपमध्ये विराटने शतकी खेळी करून फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले आहेत. अशातच पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने विराटला निवृत्त होण्याचा सल्ला दिला आहे.

आफ्रिदीच्या मते, विराट कोहलीने योग्य वेळी निवृत्ती घ्यावी. विराटने ज्या पद्धतीने करिअरची सुरूवात केली होती त्याच पद्धतीने शेवट देखील करेल. विराटने अशा वेळी निवृत्ती घ्यावी जेव्हा तो त्याच्या करिअरच्या टॉपमध्ये असेल.

वाचा- विराटने दिले जगातील आघाडीच्या १५ जणांना ओपन चॅलेंज; मी येतोय, वर्ल्डकपसाठी तयार रहा

विराटने अशा स्तरावर जाऊ नये की त्याला संघातून वगळण्याची वेळ यावी. त्याच्या ऐवजी जेव्हा तुम्ही करिअरच्या सर्वोत्तम ठिकाणी असता तेव्हा निवृत्तीची घोषणा करावी. अर्थात असे फार कमी वेळा होते. आशिया खंडातील क्रिकेटपटू फार कमी वेळा अशा प्रकारचा निर्णय घेतात. पण मला वाटते की विराट अशा पद्धतीने शेवट करेल.

वाचा- टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचे सलामीवीर बदलणार; रोहितसोबत पुन्हा प्रयोग होणार

आफ्रिदीने विराट कोहलीला हा फुकटचा सल्ला दिला खरा. पण त्यावर भारताचा फिरकीपटू अमित मिश्राने अशी प्रतिक्रिया दिली ज्यावर आफ्रिदीची बोलता बंद झाली. अमित मिश्राने एक ट्विट केले आहे ज्यात त्याने म्हटले आहे की, प्रिय आफ्रिदी काही लोक फक्त एकदाच निवृत्ती घेतात. त्यामुळे कृपया विराट कोहलीला या सर्व गोष्टीतून दूरच ठेव. आफ्रिदीने त्याच्या करिअरमध्ये अनेकदा निवृत्ती घेऊन ती मागे घेतली होती. आता तो विराटला कधी निवृत्ती घ्यायचा याचा सल्ला देतोय.

वाचा- रमीज राजांना सहन झाला नाही पाकिस्तानचा पराभव; भारतीय पत्रकारासोबत पाहा काय केलं

Amit Mishra tweet

टी-२० क्रिकेटमध्ये २०२२मध्ये विराटची कामगिरी फार चांगली झाली नाही. आयपीएलमध्ये विराटची सरासरी २५ पेक्षा कमी होती. या वर्षाच्या सुरुवातीला त्याने ४ सामन्यात फक्त ८१ धावा केल्या होत्या. पण आशिया कपमध्ये त्याने ५ सामन्यात २७६ धावा केल्या. ज्यात एक शतक आणि दोन अर्धशतकाचा समावेश होता. विराटने अफगाणिस्तानविरुद्ध १२२ धावा केल्या, हे त्याचे ७१वे शतक ठरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here