याबाबतीत माहिती अशी की, सोमवारी रात्री पोलीस उपनिरिक्षक रमाकांत शिंदे हे आपल्या सहकाऱ्यासह रात्री गस्तीस होते. यावेळी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, गुलबर्गा येथून वरुन एक गुटखा भरलेला ट्रक अहमदाबादला जात आहे. लागलीच उपनिरिक्षक शिंदे यांना सापळा रचून उमरगा – आळंद रस्त्यावर कदेर पाटिजवळ सदर संशयित ट्रक थांबवून पाहणी केली असता सदर ट्रक चालकाने ट्रकमध्ये सुगंधी सुपारी गुटखा असल्याचे सांगितले. चौकशी करिता सदर गुटखा असलेला ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला.
बुधवारी सकाळी अन्न सुरक्षा अधिकारी एन टी मुजावर यांनी आपले सहकारी नमुना सहाय्यक तुकाराम अकोसकर ,चालक नाना गाढवे सह सदर ट्रकची तपासणी केली असता त्यात ‘नजर’ ९०००० हा गुटखा मिळून आला. ३६० पोत्यामध्ये अर्धाकोटी चा मुद्देमाल मिळून आला .
याप्रकरणी ट्रक ड्रायव्हर मो . ऱियाज बाबुमिया सौदागर वय ३० रा . बिदर याला अटक केली आहे .
ही कार्यवाही जिल्हापोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी, अतिरिक्त पोलीस प्रमुख नवनीत कावत, पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश बरकते ,पोलीस निरीक्षक मनोज राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक रमाकांत शिंदे, पोलीस कर्मचारी लक्ष्मण शिंदे, विष्णू मुंडे, चालक गौतम गायकवाड यांच्या पथकाने केली.