मुंबई : ट्वेन्टी-२० विश्वचषकापूर्वी बीसीसीआयला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर आता सौरव गांगुली पुढील तीन वर्षांसाठी बीसीसीआयचे अध्यक्ष राहू शकतात. याशिवाय जय शाह पुढील तीन वर्षांसाठी बीसीसीआयचे सचिव राहतील. वास्तविक, सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला बोर्डाच्या घटनेत बदल करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे गांगुली आणि जय शाह यांना दिलासा मिळाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने घटनादुरुस्ती करण्यास परवानगी दिलीभारतीय क्रिकेट नियामक मंडळाला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. वास्तविक, सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला बोर्डाच्या घटनेत बदल करण्याची परवानगी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली पुढील तीन वर्षांसाठी बीसीसीआयचे अध्यक्ष राहू शकतात. त्याचवेळी, सौरव गांगुलीशिवाय बीसीसीआयचे सचिव जय शाह हे पुढील तीन वर्षांसाठी बीसीसीआय सचिवपदावर विराजमान होऊ शकतात.

सौरव गांगुली आणि जय शाह यांची खुर्ची जाणार नाहीतसर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि बीसीसीआय सचिव जय शाह यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. वास्तविक, सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला बोर्डाच्या घटनेत बदल करण्याची परवानगी दिली आहे. यानंतर आता सौरव गांगुली पुढील तीन वर्षांसाठी बीसीसीआयच्या अध्यक्षपदी राहू शकतात. त्याचवेळी जय शहा हे पुढील तीन दिवसही आपल्या पदावर राहू शकतात.

बीसीसीआयने मंगळवारी हा युक्तिवाद मांडला होताबीसीसीआयतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर युक्तिवाद केला, “सध्याच्या घटनेत कूलिंग ऑफ पीरियडची तरतूद आहे. जर मी राज्य क्रिकेट असोसिएशनचा एका टर्मसाठी आणि बीसीसीआयचा सलग दुसऱ्या टर्मसाठी पदाधिकारी असेन तर मला कूलिंग ऑफ पीरियडमधून जावे लागेल. दोन्ही संस्था वेगळ्या असून त्यांचे नियमही वेगळे आहेत आणि तळागाळातील नेतृत्व तयार करण्यासाठी पदाधिकाऱ्याच्या सलग दोन टर्म खूप कमी आहेत. त्यामुळे आता कोणत्याही पदाधिकाऱ्याला जर राज्याच्या संघटनेमधून बीसीसीआयमध्ये यायचे असेल तर त्यांना कुलिंग ऑफ पिरियज राहणार नाही, त्याचबरोबर त्यांना बीसीसीआयमध्ये सहा वर्षांचा कालावधी सलगपणे पूर्ण करता येऊ शकतो. त्यामुळे आता गांगुली आणि शहा हे आपल्या बीसीसीआयच्या पदावर कायम राहणार आहे. पण या निकाला निर्णय आता भारतामधील अन्य क्रीडा संघटांवर देखील होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. त्यामुळे आता भारतीय क्रीडा संघटनांमध्ये मोठे बदल होऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here