Authored by रहीम शेख | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Sep 14, 2022, 5:15 PM

Osmanabad News : दैवी चमत्कारामुळे राज्यभर प्रसिद्ध असणारे कळंब तालुक्यातील मलकापूर येथील एकनाथ सुभाष लोमटे महाराज यांच्यावर येरमाळा पोलिसात विनयभंगचा गुन्हा दाखल झाला आहे.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

 

Osmanabad Eknath Lomte Maharaj
Osmanabad News : महिला भक्तांसोबत विनयभंग, अखेर लोमटे महाराजाला दीड महिन्यांनी अटक; वाचा संपूर्ण प्रकरण

हायलाइट्स:

  • अखेर स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ महाराज लोमटे याला अटक
  • भक्त महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणात ४५ दिवसापासून फरार
  • महाराजाने अनेक महिलांची छेडछाड केल्याचा पोलिसांना संशय
उस्मानाबाद : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी फरार असलेला स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराजाला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. आशीर्वाद देण्याच्या बहाण्याने लोमटे महाराजने महिला भक्ताचा विनयभंग केला होता.

अखेर ४५ दिवसानंतर कळंब पोलिसांनी लोमटे महाराजाला आज सकाळी अटक केली आहे. कळंब तालुक्यातील मलकापूर येथे लोमटे महाराज यांचा मठ आहे. आपल्या दैवी शक्तीने महाराज आजारी व्यक्ती आणि भक्ताला बरे करतात अशी महाराजाची ख्याती आहे. या महाराजाचा राज्यभर मोठा भक्तवर्ग असून यामध्ये विविध पक्षांचे बडे नेते ही या महाराजाचे भक्त आहेत.
प्रकल्प गुजरातला गेल्याने राजकीय वादळ, फडणवीसांनी थेट रशियावरुन फोन करुन दिली महत्त्वाची सूचना
भक्त महिलेच्या विनयभंग प्रकरणात लोमटे महाराज याला अटक झाल्याने धार्मिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, लोमटे महाराजांना किती महिला भक्तांची फसवणूक केली हे तपासात उघड होईल. असं पोलिसांनी सांगितलं. लोमटे महाराज याच्यावर या पूर्वीही जादूटोणा व लोकांना फसवल्याचे गुन्हे दाखल आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

लोमटे महाराजाविरोधात यापूर्वी भोंदूगिरी करण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. याच महाराजाने महिला दर्शनासाठी आली असता तिचा विनयभंग केला. इतकच नाही तर मी तुला गुंगीचं औषधं देऊन तुझ्यावर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडिओ देखील शूट केल्याची धमकी देखील लोमटे महाराजाने पीडित महिलेला दिल्याची माहिती समोल आली. या पीडितेच्या तक्रारीवरुन लोमटे महाराजावर गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होताच लोमटे महाराज फरार झाला होता.

भारतीय क्रिकेटपटूने एका वाक्यात आफ्रिदीची बोलती बंद केली; दिला होता हा फुकटचा सल्ला

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here