मुंबई : सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा हे दोन क्रिकेच विश्नातील दोन दिग्गज पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. त्यामुळे चाहत्यांना आता सचिन आणि लारा यांचा खेळ पाहण्याची संधी मिळणार आहे. पण हा सामना नेमका कधी, किती वाजता आणि कुठे पाहता येणार, याची माहिती आता समोर आली आहे.

इंडिया लीजंड आणि वेस्ट इंडिज लीजंड यांच्यातील हा सामना कधी होणार?इंडिया लीजंड आणि वेस्ट इंडिज लिजंड यांच्यातील हा सामना बुधवार, १४ सप्टेंबर रोजी होणार आहे.

इंडिया लीजंड आणि वेस्ट इंडिज लीजंड यांच्यातील हा सामना कुठे होणार आहे?
इंडिया लीजंड आणि वेस्ट इंडिज लीजंड यांच्यातील हा सामना ग्रीन पार्क, कानपूर येथे होणार आहे.

इंडिया लीजंड आणि वेस्ट इंडिज लीजंड यांच्यातील हा सामना किती वाजता सुरू होईल?
संध्याकाळी ७.३० वाजता इंडिया लिजंड आणि वेस्ट इंडिज लिजंड यांच्यात सामना होईल.

इंडिया लीजंड आणि वेस्ट इंडीज लीजंड यांच्यातील या सामन्याचा नाणेफेक किती वाजता होईल?
इंडिया लिजंड आणि वेस्ट इंडिज लिजंड यांच्यातील या सामन्याचा नाणेफेक संध्याकाळी ७.०० वाजता होणार आहे.

इंडिया लीजंड आणि वेस्ट इंडीज लीजंड यांच्यातील हा सामना कुठे पाहायचा?
स्पोर्ट्स 18, कलर्स सिनेप्लेक्स आणि कलर्स रिश्ते चॅनलवर तुम्ही इंडिया लीजेंड आणि वेस्ट इंडिज लीजेंड यांच्यातील हा सामना पाहू शकता, तर तुम्ही Jio TV Voot अॅपवर त्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. याशिवाय मॅच संबंधित माहितीसाठी तुम्ही महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम या वेबसाइटला भेट देऊ शकता.

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या सहाव्या मॅचमध्ये इंडिया लिजंड आणि वेस्ट इंडिज लीजंड आमनेसामने असतील. इंडिया लीजेंडचे नेतृत्व महान सचिन तेंडुलकरकडे आहे, तर वेस्ट इंडिजचे नेतृत्व रन मशीन ब्रायन लारा करत आहे. बऱ्याच वर्षांनंतर दोघेही एकमेकांविरुद्ध मैदानात उतरतील. क्रिकेटच्या मैदानावरील चाहत्यांसाठी हा सामना एखाद्या सेलिब्रेशनपेक्षा कमी नाही. पहिल्या सामन्यात भारत लिजंडने दक्षिण आफ्रिकेच्या लीजंडविरुद्ध चमकदार कामगिरी केली आणि ६१ धावांनी विजय मिळवला. त्या सामन्यात स्टुअर्ट बिन्नीने ४२ चेंडूत ८२ धावा केल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here