Authored by जयंत सोनोने | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Sep 14, 2022, 6:49 PM

Amravati news : मेळघाटात सध्या अस्वलांच्या हल्ला करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. चिखदरा तालुक्यातील राहू येथे आज एका २७ वर्षीय तरुणावर एका अस्वलीने हल्ला केला. या हल्ल्यात तरुण जखमी झाला आहे.

 

Amravati news
Amravati News : गुरे चारण्यासाठी जंगलात, २७ वर्षीय तरुणासोबत घडलं धक्कादायक…

हायलाइट्स:

  • घनदाट जंगलात गुराख्यावर अस्वलीचा हल्ला
  • पाळीव जनावरांमुळे वाचला जीव
  • अमरावतीतील मेळघाटातील घटना
अमरावती : मेळघाटात सध्या अस्वलीच्या हल्ला केल्याच्या घटनेत वाढ झाली असून इतक्यात मोठ्या प्रमाणात अस्वलीचे हल्ला झाल्याच्या घटना मेळघाटात घडत आहेत. नुकतीच चौऱ्यामालेतील घटना ताजी असतानाच चिखलदरा तालुक्यातील राहू येथे दुसरी घटना आज घडली आहे. आज दुपारी दोनच्या सुमारास राहू जंगलात अमरलाल जिरु उईके (वय २७) राहणार तोरणवाडी हा तरुण राहू येथे नोकर म्हणून गुराख्याचं काम करत होता. दररोज जंगलात गुरे चारण्यासाठी जात होता.

मात्र, बुधवारी दुपारच्या सुमारास एका अस्वलीने त्याच्यावर अचानक हल्ला चढविला या हल्ल्यात त्याच्या हातावर व पायावर अस्वलीने जोरदार हल्ला करून चावा घेतला. परंतु गुरांनी आरडाओरडा केल्याने व त्याने देखील आरडाओरडा केल्याने तो बचावला प्राथमिक उपचारासाठी त्याला चुरणी ग्रामीण रुग्णालय येथे उपचार करण्यात येत आहे.

उदय सामंत म्हणाले,’ठाकरे सरकारने पॅकेज द्यायला उशीर केला’; आदित्य ठाकरेंनी हाणला सणसणीत टोला
जारीदा वनपरिक्षेत्र अंतर्गत राहू जंगलातील वनखंड क्रमांक ४१२ या जंगलात अस्वलिने संबंधित इसमावर हल्ला करून त्याला जखमी केले त्याला आम्ही उपचारासाठी चुरणी ग्रामीण रुग्णालय येथे घेऊन आलो असून त्याची प्रकृती चांगली आहे असे वनरक्षक प्रेमला
ल चिमोटे त्यांनी बोलताना सांगितले

तरुण मुख्यमंत्री, पण भल्याभल्यांना नडला, जगन रेड्डींनी गुजरात, महाराष्ट्रालाही चक्रावून सोडलंय

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here