Authored by सरफराज सनदी | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Sep 14, 2022, 8:20 PM

Sangli News : हिंदुत्वासाठी सत्तेत आलेल्या शिंदे आणि भाजपा राज्य सरकारच्या काळात साधू सुरक्षित नाहीत,अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

 

Sangli News
Sangli News : हिंदुत्वासाठी सरकार सोडणाऱ्यांच्या राज्यात साधू सुरक्षित नाहीत; राष्ट्रवादीची घणाघाती टीका

हायलाइट्स:

  • हिंदुत्वासाठी सरकार सोडणाऱ्यांच्या राज्यात साधू सुरक्षित नाहीत
  • सांगलीतल्या जत तालुक्यातील घटनेवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया
  • लवंगा येथे उत्तर प्रदेश येथील चार साधूंना मारहाण
सांगली : हिंदुत्वासाठी सत्तेत आलेल्या शिंदे आणि भाजपा राज्य सरकारच्या काळात साधू सुरक्षित नाहीत,अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. तसेच साधूंना मारहाण करणे योग्य असून केलेली मारहाण चुकीची असल्याचं मत देखील जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.

जत तालुक्यातल्या लवंगा येथे उत्तर प्रदेश येथील चार साधूंना मुले चोरणारी टोळी असल्याचे समजून जमावाकडून झालेल्या मारहाणीचे पडसाद सगळीकडेच उमटत आहेत. साधूंच्या या मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. साधूंच्या हिंदुत्वासाठी सरकार सोडले आणि साधू या राज्यात सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे, अशा शब्दात जयंत पाटलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच साधूंना मारहाण करणे हा प्रकार योग्य नसून ,अश्या प्रकारे साधूंना मारहाण करणे चुकीचा आहे,असे मत देखील आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्र सगळ्याबाबतीत सरस होता, तरी Vedanta Foxconn प्रोजेक्ट गुजरातला का गेला हेच कळत नाही: उदय सामंत
दरम्यान, मुले पळवणारी चोरांची टोळी समजून चौघा साधूंना बेदम मारहाण केलाचा धक्कादायक प्रकार काल जत तालुक्यातल्या लवंगा या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. उत्तर प्रदेशमधील लवंगा या ठिकाणी आलेल्या चौघा साधूंना चोर समजून ग्रामस्थांनी ही मारहाण केल्याचा प्रकार घडला. सुदैवाने पालघर सारखी घटना होता-होता टळली आहे. या घटनेची नोंद उमदी पोलिस ठाण्यामध्ये झाली आहे.

शिंदे गटच अधिकृत शिवसेना आहे सांगितलं, तरी भाजपने धनुष्यबाणाची जागा हिसकावली

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here