मुंबई: वेदांता-फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला आहे. यासाठी जबाबदार कोण यावरून सध्या वादंग माजला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेते याचं खापर महाविकास आघाडी सरकारवर फोडत आहेत. तर विरोधकांनी यावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी गेलेला प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्ला विरोधी पक्षातील नेत्यांनी दिला आहे.

वेदांताच्या गेलेल्या प्रकल्पावरून राज्यात वादंग माजला आहे. सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर महाराष्ट्राला काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. गुजरातला गेलेल्या प्रकल्पापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देऊ, असा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्याला दिल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं. वेदांताचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी सीएनबीसी टीव्ही१८ ला एक मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी समूहाच्या पुढील प्रकल्पांबद्दल सांगितलं.
बॉसची झोप उडाली होती! Vedanta-Foxconn प्रकल्प गुजरातला गेल्यावर काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या निर्मितीला चालना देण्यासाठी वेदांता समूह ऍपल आयफोन्स आणि टीव्ही उत्पादनासाठी एक हब स्थापन करणार असल्याचं अग्रवाल म्हणाले. आयफोनच्या निर्मितीसाठी टाटा समूहदेखील स्पर्धेत आहे. सध्या टाटा समूहाची तैवानमधील बलाढ्य कंपनी विस्ट्रॉनशी बोलणी सुरू आहे.

इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या निर्मिती क्षेत्रातील चीनचा दबदबा मोडून काढण्यासाठी भारतीय कंपन्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून वेदांता फॉक्सवॉन प्रकल्पाची सुरुवात होत आहे. सेमीकंडक्टर आणि डिस्प्लेच्या निर्मिती प्रकल्पात वेदांता समूह १,५४,००० कोटींची गुंतवणूक करणार असून त्यामुळे जवळपास १ लाख रोजगार तयार होतील.
Uddhav Thackeray : ठाकरे सरकार – वेदांता फॉक्सकॉनमधील वाटाघाटींचा तपशील उघड करावा, भाजप नेत्याची मोठी मागणी
सेमीकंडक्टर निर्मितीचं हब होण्यासाठी आणि जगाची गरज भागवण्यासाठी देशाला २ सेमीकंडक्टर हबची गरज असल्याचं अग्रवाल म्हणाले. दुसऱ्या हबसाठी आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रानं आम्हाला प्रस्ताव दिला आहे. गुजरातमधील प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर आम्ही दुसऱ्या प्रकल्पात लक्ष घालू, असं त्यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here