woman murder her husband: तरुणाच्या हत्येचं गूढ उकलण्यात इंदूर पोलिसांना अखेर यश आलं आहे. एरोड्रम पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या संगम नगरमध्ये सोमवारी एका गोणीत तरुणाचा मृतदेह सापडला होता. तरुणाचे हात पाय बांधलेले होते. या प्रकरणी पोलिसांनी तरुणाच्या पत्नीला आणि भाच्याला बेड्या ठोकल्या आहेत.

 

indore crime
इंदूर: तरुणाच्या हत्येचं गूढ उकलण्यात इंदूर पोलिसांना अखेर यश आलं आहे. एरोड्रम पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या संगम नगरमध्ये सोमवारी एका गोणीत तरुणाचा मृतदेह सापडला होता. तरुणाचे हात पाय बांधलेले होते. या प्रकरणी पोलिसांनी तरुणाच्या पत्नीला आणि भाच्याला बेड्या ठोकल्या आहेत.

हत्या झालेल्या तरुणाचं नाव देवेंद्र अग्रवाल होतं. देवेंद्रच्या भावानं त्याचा मृतदेह ओळखला. आता पोलिसांनी देवेंद्रच्या हत्येप्रकरणी त्याची पत्नी आणि भाच्याला अटक केली आहे. देवेंद्र आणि नेहा यांना दोन मुलं आहेत. देवेंद्र आणि नेहा १३ महिन्यांपासून वेगळे राहत होते. या दरम्यान नेहा आणि तिचा भाचा विक्की यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यांच्या संबंधांमध्ये देवेंद्र अडथळा ठरत होता. त्यामुळे नेहा आणि विक्कीनं देवेंद्रची गळा दाबून हत्या केली.
टाईल्स लावले, पण घरमालक पैसे देईना; मिस्त्रीनं पेट्रोल टाकून घराबाहेरची मर्सिडीज पेटवली
देवेंद्र सोमवारी पत्नीच्या घरी गेला. तिथे नेहा आणि विक्कीसोबत त्याचा वाद झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. या दरम्यान दोघांनी देवेंद्रची गळा आवळून हत्या केली. दोघांनी देवेंद्रचा मृतदेह गोणीत भरला. त्यानंतर त्यांनी लोडिंग रिक्षातून मृतदेह रात्री उशिरा संगम नगरातील कासलीवाल येथे आणला. घरा रिकाम्या शेतात त्यांनी मृतदेह फेकून दिला.
माता न तू वैरिणी! दीड महिन्यांच्या लेकीचा आईनं गळा दाबला; डॉक्टरांनी CCTV पाहिले अन् मग…
देवेंद्रचा मृतदेह सापडताच त्याच्या भावानं नेहा आणि विक्कीवर हत्येचा आरोप केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली. चौकशीतून सत्य समोर आलं. दोघांनी हत्येची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. प्रेमसंबंधातून हत्या झाल्याची माहिती इंदूरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त जयवीर भदौरिया यांनी दिली. महिलेचे तिच्या भाच्यासोबत अवैध संबंध होते. त्यात पती अडथळा ठरत होता. त्यामुळे तिनं भाच्याच्या मदतीनं पत्नीची हत्या केल्याचं भदौरिया यांनी सांगितलं.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here