गुजरात सरकारने चपळाई दाखवत Vedanta Foxconn कंपनीशी यासंदर्भातील सामंजस्य करारही (MOU) करुन टाकला. त्यामुळे महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. परंतु, आता तळेगावच्या तुलनेत गुजरातमधील धोलेरा ही प्रकल्पाची जागा फारशी चांगली नसल्याची माहिती समोर आहे. Vedanta Foxconn कंपनीने यासंदर्भात तयार केलेल्या अहवालातही धोलेरा येथील जागा प्रकल्पासाठी फारसा चांगला पर्याय नसल्याचे म्हटले होते. याउलट तळेगाव परिसरात या प्रकल्पासाठी हवी असलेली इकोसिस्टम, कनेक्टिव्हिटी, कुशल मनुष्यबळ सहजपणे उपस्थित होते. तरीही Vedanta Foxconn कंपनीने आपल्या प्रकल्पासाठी गुजरातची निवड केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
तळेगावची जागा प्रकल्पासाठी का अनुकूल?
* तळेगावात राज्य सरकारने या प्रकल्पासाठी अखंड पाणी आणि वीज पुरवठा उभारण्याचे आश्वासन दिले होते.
* MIDC कडून या परिसरात ७५० मेगावॅटचा वीज प्रकल्प उभारण्यात येणार आहे
* तळेगावमधील प्रकल्पाच्या जागेपासून ५० किलोमीटरच्या परिसरात कुशल मनुष्यबळ उपलब्ध
* या भागात अत्याधुनिक सुविधांनी युक्त असलेले निवासी संकुल उभारणे शक्य
* तळेगावच्या २०० किमी भागात सप्लाय चेन, दुकानदार आणि ग्राहक अश्या गोष्टी मुबलक उपलब्ध आहेत
* तळेगाव परिसरात इलेक्ट्रॉनिक कंपनीला लागणारे उत्पादन पूरक वातावरण
* तळेगाव आसपास राज्य सरकार आधुनिक टाऊनशिप उभारणार आहे. ज्यात सर्व सुविधा असतील.
गुजरातमधील धोलेरा Vedanta Foxconn प्रतिकूल का?
* Vedanta Foxconn कंपनीकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात अनेक कारणांमुळे गुजरातच्या धोलेरा येथील जागा प्रकल्पासाठी योग्य नसल्याचे नमूद करण्यात आले होते.
* पाणी पुरवठ्याबाबत वेदांता फॉक्सकॉनच्या अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली होती. गुजरात सरकारने नर्मदा कालव्यातून पाणी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांना साशंकता वाटत होती.
* धोलेरा परिसरात या प्रकल्पासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ सहजासहजी उपलब्ध नाही
* धोलेरातील प्रतिकूल हवामान हा या प्रकल्पातील आणखी एक अडथळा मानला जात आहे.
* धोलेरा परिसरातील वातावरण इलेक्ट्रॉनिक कंपनीला अनुकूल नाही