लोककला क्षेत्रातील ज्येष्ठ कलावती गुलाबबाई संगमनेरकर (वय ९३) यांचे आज पुण्यात निधन झाले. लोककला क्षेत्रात प्रदीर्घ कामगिरीसाठी राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा मानाचा ‘लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार’ त्यांना २०२० मध्ये जाहीर झाला होता.

 

Gulabbai Sangamnerkar
जेष्ठ लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर काळाच्या पडद्याआड, पुण्यात झाले निधन
अहमदनगर : मूळच्या संगमनेरच्या असलेल्या ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांचे वयाच्या ९० व्या वर्षी पुणे येथे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायलेल्या अतिशय मोजक्या लावण्यांपैकी ‘राजसा जवळी जरा बसा’ या लावणीवर गुलाब बाई संगमनेर यांनी अदाकारी करावी, अशी इच्छा खुद्द लता दीदींनी व्यक्त केली होती. गुलाबबाईंनीही लतादीदींचा शब्द प्रमाण मानून या लावणीवर तितकीच दर्जेदार अदाकारी केली होती.

सुप्रसिद्ध संगीतकार विठ्ठल शिंदे यांच्या संगीत दिग्दर्शनात त्यांनी गायलेल्या अनेक लावण्या त्याकाळी आकाशवाणीवरील कामगार सभेत प्रसारित व्हायच्या. त्यांना दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाचा विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here